
Sign up to save your podcasts
Or


मुंबईत एका सोसायटीने अलीकडेच बाहेरच्या रस्त्यावर ‘नो किसिंग झोन’ असा बोर्ड लावला आहे. लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक बागा आणि चौपाट्या बंद असल्यामुळे तरुण प्रेमी युगुलं सोसायट्यांच्या बाहेर एकत्र जमतात, एकमेकांना मिठी मारतात, चुंबन घेतात. याला आळा बसावा हा सोसायटीवाल्यांचा प्रयत्न होता. तर मुलांच्या मते इतर जागा बंद असल्यामुळे ते असे जमतात. कुणाला त्रास देण्यासाठी नाही. या प्रकारातून पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी किसिंगवर बंदी असावी का? किंसिंग अश्लील आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याविषयी कायदा काय सांगतो जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...
एखादा देश इतका गरीब झालाय की त्यांनी पंतप्रधानांचं निवासस्थानच भाड्याने देण्यासाठी काढलंय असं तुम्ही कुठे ऐकलंत तर! आणि त्यातही हा देश पाकिस्तान असेल तर! सरकारी कामकाजावर होणारा खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने पंतप्रधानांचं निवासस्थानच भाड्याने देऊ केल्याची बातमी मध्यंतरी तिथल्याच काही टीव्ही चॅनलनी दिली होती. मग ती भारतातही पसरली. पण हे खरं आहे का? ही बातमी आली कुठून? या मागचं वास्तव काय आहे आणि पाकिस्तान सरकार खरंच पंतप्रधान निवासस्थान भाड्याने देऊ शकतं का? ऐकूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...
कोरोना व्हायरस इतका बदलतोय म्हणजे म्युटेट होतोय की, जगभरात लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याच्या काही घटना समोर आल्यात. त्यावर उपाय म्हणून काही देशांनी लशीचे बूस्टर डोसही सुरू केले. तेव्हापासून तुमच्यातल्या काही प्रेक्षकांनीही हा प्रश्न पॉडकास्ट किंवा सोपी गोष्टमध्येही अनेकदा विचारलाय, की लशीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे का? आज सोपी गोष्टमध्ये हेच जाणून घेऊया…
केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी ई-रुपी योजनेचं उद्घाटन सोमवारी झालंय. या अंतर्गत विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना एका मोबाईल संदेशाद्वारे आर्थिक मदत मिळू शकेल. लोकांच्या हातात एका मोबाईल क्लिकवर पैसे देणारी ही ई-रुपी योजना आणि तिचे फायदे-तोटे समजून घेऊया
अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान वेगाने मोठाल्या भूभागावर नियंत्रण मिळवतंय. त्याचवेळी तालिबानी शिष्टमंडळ चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घ्यायला पोहोचलं. चीनच्या मदतीने तालिबान अफगाणिस्तानावरची आपली पकड मजबूत करू पाहतंय. चीन आणि तालिबानचं जवळ येणं भारतासाठी धोकादायक ठरू शकेल का?
कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पुराने हाहाःकार माजवला. यापूर्वीही अनेक भागांना पुराचा असाच तडाखा बसला होता. पण त्या अनुभवातून प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही का असा प्रश्न हे पूरग्रस्त करत आहेत. आधी नियोजनाचा अभाव, नंतर एकापाठोपाठ एक नेत्यांचे दौरे आणि त्यात अडकलेलं प्रशासन या सगळ्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळचा पूर रोखण्यात नियोजन कमी पडलं का? नेत्यांचे दौरे मदतकार्यात अडथळे आणतात का? ऐका ही सोपी गोष्ट.
संशोधन- दिपाली जगताप
दोन राज्यांमध्ये असलेला सीमावाद ही काही नवीन गोष्ट नाही. पण आसाम आणि मिझोराममधील सीमावाद इतका टोकाला गेला की दोन्ही पोलीस दलांमध्ये संघर्ष झाला. आसामचे सहा पोलीस या संघर्षात मारले गेले. आज मिझोराम राज्य असलेला प्रदेश एकेकाळी आसामचा भाग होता. मग या सीमावादाची सुरुवात झाली कुठे? ही दोन राज्य हा प्रश्न मिटवू शकतील की नाही?
संशोधन- सिद्धनाथ गानू
गेल्या काही वर्षांत दुष्काळ, ढगफुटी, पूर अशी टोकाची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. आपल्याला एकाच वेळी दोन टोकाच्या संकटांशी सामना का करावा लागतो आहे? या सगळ्या गोष्टींमागे हवामान बदल हे कारण आहे का? जगभरात तापमानवाढ आणि हवामान बदलाबद्दल काही काळ चर्चा होत आहे. या सगळ्याचे आपल्यावर काय परिणाम होतायत?
24 जुलै 1991 ला डॉ. मनमोहन सिंग यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. भारताने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि एक मोठं संकट टळलं. पण उदारीकरण म्हणजे नेमकं काय? त्याचा फायदा झाला की तोटा?
संशोधन- टीम बीबीसी
कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत असताना जपानने वेगाने आपल्या सीमा बंद केल्या नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी इतर अनेक देशांप्रमाणे जपानने लॉकडाऊनचाही आधार घेतला नाही. काही काळपर्यंत जपानने कोव्हिडवर नियंत्रण मिळवल्याचं चित्र होतं. पण आता जपानमध्ये काय परिस्थिती आहे? टोकियो ऑलिम्पिकपूर्वी जपानमध्ये केसेस का वाढत आहेत?
संशोधन- टीम बीबीसी
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,570 Listeners

1,045 Listeners

5,519 Listeners

1,807 Listeners

1,799 Listeners

1,025 Listeners

1,977 Listeners

3,223 Listeners

728 Listeners

1,006 Listeners

1 Listeners