
Sign up to save your podcasts
Or


भविष्य निर्वाह निधी किंवा प्रॉव्हीडंट फंड( Employees' Provident Fund) वर आता कर आकारणीला सुरुवात झाली आहे. प्रॉव्हीडंट फंडात वर्षाला अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्यास, त्याच्या व्याजावर कर भरावा लागेल. म्हणजे नेमकं काय होणार आहे? सरसकट सगळ्यांसाठी व्याजावर कर लावला जाणार का? दरवर्षी लागणार का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
नरेंद्र मोदी सरकार तालिबानविषयी आपलं धोरण बदलत असल्याचं चित्र आहे. मंगळवारी (31 ऑगस्ट) कतारमध्ये भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकझाईंची भेट घेतली.
भारतात कोव्हिड-19नं आता काही प्रमाणात 'एंडेमिक स्टेज' म्हणजे स्थानिक आजाराचं रूप घेतलं असावं, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHOच्या वरिष्ठ संशोधक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. पण भारतात खरंच असं काही होत आहे का? एखादा आजार एंडेमिक होणं म्हणजे काय? त्यानं साथीवर कसा परिणाम होऊ शकतो?
अफगाणिस्तान हे अमेरिकेचं सर्वांत दीर्घकाळ चाललेलं युद्ध होतं. अमेरिकेने आपलं सगळं सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर काढलं आहे. 20 वर्षं तिथे राहूनही अमेरिका तालिबानचा बीमोड करू शकली नाही. तालिबानने अमेरिकेवर मात कशी केली? यापूर्वी अमेरिकेवर अशी वेळ कधी आली होती?
संशोधन- झुबेर अहमद
20 वर्षं सत्तेबाहेर राहूनही तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपली मुळं शाबूत ठेवली. शस्त्रास्त्रं खरेदी, फौजा पोसणं यासाठी तालिबानने पैसा आणला कुठून? अमली पदार्थांचा व्यापार, खंडणी गोळा करणं या सगळ्यातून तालिबानने किती पैसा उभा केला आहे? अफगाणिस्तानच्या डबघाईत असलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी तालिबान कसं देऊ शकेल? तालिबानच्या खात्याचा ताळेबंद मांडणारी ही सोपी गोष्ट.
लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मनानं, शरीरानं, सर्वार्थानं एकत्र येणं. पण या नाजूक नात्याच्या पडद्याआड एखाद्या महिलेवर तिच्या नवऱ्यानंच बळजबरी केली तर? तो गुन्हा ठरेल का?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी दिल्लीत जाहीर केलेल्या नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन (NMP) नुसार सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकीची एकूण सहा लाख कोटी रुपयांची मालमत्ता खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. त्यावरून राहुल गांधी आक्रमक झालेत आणि सरकार सगळी संपत्ती विकून टाकतंय असा त्यांनी आरोप केलाय. राहुल गांधींना मॉनेटायझेशनचा अर्थच कळला नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. पण मॉनेटायझेशन किंवा मुद्रिकरण म्हणजे नेमकं काय होणार आहे? सरकारनं काय जाहीर केलं आहे? सरकारची त्यामागची भूमिका काय आहे आणि त्याला विरोध का होतो आहे?
कोरोनाचे आकडे आता कमी होत आहेत. सार्वजनिक ठिकाणं उघडत आहेत. आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात होतेय.. पण त्यातच बातमी आली की तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येऊ शकते. खरंच तसं होणार आहे का? त्याबद्दल जाणकार, डॉक्टर आणि सरकारचं काय म्हणणं आहे? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये…
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं पोलिसांत तक्रार दाखल करण्याबरोबरच राज्यांत राणेंच्या विरोधात आंदेलनही सुरू केलं आहे. नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद तसा पंचवीस वर्षं जुना आहे. आज सोपी गोष्टमध्ये बघूया दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी कशी पडली?
देशात आणि देशाबाहेरही अलीकडे झालेल्या काही सर्वेक्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घसरत चालल्याचं समोर आलं आहे. इंडिया टूडे साप्ताहिकाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात तर फक्त 24% लोकांना वाटतंय की, नरेंद्र मोदीच पुढचे पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार आहेत. मोदींची लोकप्रियता खरंच घसरतेय का? घसरत असेल तर पुरावा काय? आणि काय आहेत त्या मागची कारणं, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners