
Sign up to save your podcasts
Or


भारत आणि चीन सीमेवरून गेली अनेक दशकं वाद सुरू आहे. चीनने 1962 मध्ये भारतावर आक्रमण केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी युद्धात वरचढ ठरत असूनही माघार घेतली. भारताने चीनविरोधात काय डावपेच लढवले? चीन आजही भारतीय भूभागांवर दावा का सांगतो? अरुणाचल प्रदेशला चीन दक्षिण तिबेट का म्हणतो? ऐका ही सोपी गोष्ट.
मोदी सरकारने राजकीय पक्षांना देणगीतून मिळणारा काळा पैसा दूर ठेवण्याच्या इराद्यानं 2017 साली इलेक्टोरल बाँड्सची योजना आणली होती. तेव्हापासूनच इलेक्टोरल बाँड्सवर सातत्याने टीका होतेय. पण भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांसारख्या राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्षही इलेक्टोरल बाँड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचं एका अहवालातून समोर आलंय.
गेल्या काही दिवसांत चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालायला सुरुवात केली. चीन म्हणतं तैवान त्यांचाच एक प्रांत आहे, पण तैवानचं म्हणणं आहे की ते एक स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि चीन आपलं म्हणणं त्यांच्यावर लादू शकत नाही. अशात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग चीनच्या एकीकरणाबद्दल बोलतायत. चीन तैवानशी युद्ध करण्याची तयारी करतोय का? यांच्यातलं भांडण नेमकं कुठे सुरू झालं?
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
जवळपास 100 वर्षांनंतर मलेरियावरची पहिली लस उपलब्ध झालीय. आफ्रिका खंडातल्या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना या RTS,S लशीचे 4 डोस आता देण्यात येणार आहेत.
शी जिनपिंग यांच्या कॉमन प्रॉस्पेरिटी या उद्दिष्टासाठी चीन काय पावलं उचलतोय याकडे जगाचं लक्ष आहे. गरीब-श्रीमंत दरी कमी करण्यासाठी चीन काय करणार आहे? उच्च उत्पन्न असलेल्यांना चीन काय संदेश देतं आहे? बड्या उद्योगांना या धोरणाचा फटका बसणार आहे का?
संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
गेले काही दिवस देशात कोळशाचा साठा संपत आल्यामुळे काही राज्यांमध्ये अचानक वीज जाऊ शकते किंवा लोड शेडिंगही सुरू करावं लागू शकतं, अशा बातम्या सगळीकडे पसरल्या आहेत. कोरोनानंतर वाढलेली मागणी आणि त्याप्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे ही समस्या सध्या उद्भवली आहे. पण, खरंच वीज निर्मिती ठप्प होऊन सणासुदीच्या काळात आपल्याला अंधारात जावं लागेल का? आणि इतकी वर्षं झाली तरी आपण अजून कोळशाऐवजी इतर नैसर्गित स्त्रोत वापरून उर्जा निर्मिती का करू शकत नाही? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
चीनने जगाला कर्जाच्या दलदलीत अडकवलं आहे का, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. अमेरिके पाठोपाठ चीनही जगातली दुसरी आर्थिक महासत्ता आहे. पण, अध्यक्ष शी जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्प मात्र गरीब देशांच्या जीवावर उठला आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, अशा प्रकल्पामधून चीनची रणनिती स्पष्टपणे दिसतेय. आणि ती म्हणजे जगातल्या जमेल तितक्या देशांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीसाठी गुंतवणूक करायची. आणि त्या माध्यामातून देशाच्या आर्थिक नाड्या आपल्याकडे ओढायच्या. पण, याचे जगावर नेमके काय परिणाम होत आहेत जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...
डॉक्टरकडे गेल्यावर पेशंटची मेडिकल हिस्ट्री घेताना अनेकदा खूप वेळ लागतो. पण तुमची आरोग्यविषयक सगळी माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रकल्प आहे. आयुष्यान भारत डिजिटल मिशनच्या माध्यमातून प्रत्येकाला एक हेल्थ आयडी मिळू शकेल ज्यावर त्यांची सगळी आरोग्यविषयक माहिती साठवली जाईल. याचा नेमका कसा फायदा होईल? यात कुठले धोके आहेत का? ऐका आजची सोपी गोष्ट.
केरळचं पद्मनाभस्वामी मंदिर जगातलं सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. पण याच मंदिराचा कारभार चालवण्यासाठी देवस्थानच्या समितीला आर्थिक मदतीची गरज भासली, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दादही मागितली. पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पद्मनाभस्वामी मंदिराची गोष्ट काय आहे? आणि अशा श्रीमंत देवस्थानांच्या संपत्तीचा सरकारला वापर करता येईल का?
ईव्हरग्रांड या चिनी रियल इस्टेट कंपनीवर तब्बल 300 अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज आहे. हे कर्ज अवाढव्य चीनच्या जीडीपीच्या 2% इतकं आहे. मूळात कंपनीवर इतकं कर्ज कसं झालं. आणि त्यामुळे जगावर 2009च्या लेहमन ब्रदर्स सारखं मंदीचं संकट येऊ शकतं का? जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - टीम बीबीसी
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners