सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमची कार महाग होण्याची ही आहेत 4 मोठी कारणं

    एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत आणि दुसरीकडे कारची किंमतही वाढलीय. महागाईचा दुहेरी फटका का बसतो आहे? भारतासह जगभरात कारच्या किमती का वाढल्या आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागात.

    संशोधन- टीम बीबीसी
    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले.

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: एसटी संप भाजपमुळे चिघळतोय या आरोपात तथ्य किती?

    संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भाजप नेते चिथावत आहेत, भरकटवत आहेत आणि ते नंतर त्यांची जबाबदारी घेणार नाहीत असा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. भाजपचे नेते म्हणतात की हे लोकांचं आंदोलन आहे आणि सरकार अहंकारी आहे. दोन्ही बाजूने केल्या जाणाऱ्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? ऐकू या आजची सोपी गोष्ट.

    संशोधन- दीपाली जगताप

    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट - महाराष्ट्र का गारठला?

    गेले दोन दिवस राज्यात संध्याकाळनंतर पारा घसरतोय. 10 नोव्हेंबरला पुण्यामध्ये 10 अंश सेल्शियस तापमान नोंदवण्यात आलं. इतरही ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमी आहे.

    नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात इतकी थंडी का आली? यंदाचा हिवाळा कसा असणार आहे? उत्तर भारतात काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी ऑक्टोबर अखेरपासूनच बर्फवृष्टीला सुरुवात झालीय.

    हे सगळं कशामुळे होतंय? ला निना आणि एल निनो या हवामान विषयक संज्ञा काय आहेत? आणि त्यांचा जगभरातल्या हवामानावर काय परिणाम होतो? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन आणि लेखन : जान्हवी मुळे, अमृता दुर्वे

    निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: इन्स्टाग्रामचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतोय का?

    इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक आणि प्रतिकूल परिणाम होतोय असा एक निष्कर्ष या अ‍ॅपची मुख्य कंपनी मेटाच्याच एका अंतर्गत अहवालात निघाला होता. आणि त्यानंतर अख्ख्या अमेरिकेत आणि हळू हळू जगभरात गहजब माजला. खरंच इन्स्टाग्रामचा असा परिणाम मुलांच्या मनावर होतो का? नेमका काय परिणाम होतो? आणि वाईट परिणाम टाळण्यासाठी काय करावं जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - शिओना मॅक्युलम

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: IPO म्हणजे नेमकं काय?

    दिवाळीचा हंगाम हा शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांसाठी आयपीओचा हंगाम म्हटला जातो. कारण, साधारण या सुमारास बाजारात नवीन आयपीओ म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफर्स येतात. पण, आयपीओ म्हणजे नेमकं काय, त्यात गुंतवणूक करावी की न करावी? गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन, लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग- निलेश भोसले

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाचा ‘हा’ जिन भारतीयांसाठी धोकादायक?

    कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या काळात कोरोना अनेकदा बदलला; त्यात जनुकीय बदल झाले. त्याचवेळी शास्त्रज्ञांचा असाही अभ्यास सुरू होता की, कुठल्या प्रकारच्या लोकांना याचा धोका सर्वाधिक आहे आणि का? याचं एक उत्तर असं आहे की, दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांमध्ये शास्त्रज्ञांना एक असा कोव्हिड जिन्स आढळून आला आहे ज्यामुळे फुप्फुसाला इजा होऊन कोव्हिडमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण या लोकांमध्ये दुप्पट आहे. पण, म्हणून घाबरून जाण्याची गरज आहे का? या नव्या कोव्हिड जिन आणि त्याच्या संशोधनाबद्दल आज जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - टीम बीबीसी

    लेखन - ऋजुता लुकतुके
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    4 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : एसटी महामंडळाचं विलीनीकरण करावं अशी मागणी का होतेय?

    गेली काही वर्ष राज्यातली परिवहन सेवा तोट्यात आहे. कोव्हिडच्या लॉकडाऊनचा एसटीलाही मोठा फटका बसला. लॉकडाऊनचा बराच काळ एसटीची सेवा पूर्णपणे बंद होती. तर एसटी सेवा सुरू झाल्यानंतरही प्रवाशी संख्येत घट झालेली आहे.

    कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावेत, पगारवाढ मिळावी, घरभाडं भत्ता आणि महागाई भत्ता वाढवावा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं.
    त्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता आणि घरभाडं भत्ता वाढवण्याची घोषणा केली. पण एक कर्मचारी संघटना एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन करतेय.
    नेमकं काय होईल या विलीनीकरणाने ? आणि राजकीय पक्षांनी यावर काय भूमिका घेतली आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट

    संशोधन, लेखन, निवेदन : अमृता दुर्वे

    व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : शेअर बाजारात गुंतवणूक करणं किती फायद्याचं वा धोक्याचं?

    शेअर बाजारातल्या चढउतारांबद्दल नेहमी चर्चा होत असते. जगभरातल्या घडामोडींचे परिणाम शेअर बाजारावर होत असतात. स्टॉक मार्केटमध्ये नेमकी किती गुंतवणूक करावी? त्यासाठी काय करावं लागतं? आणि यात पैसे बुडायचा किती धोका असतो?

    समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट

    संशोधन, निवेदन : ऋजुता लुकतुके

    व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : पेट्रोल,डिझेलच्या किमती कधी कमी होतील?

    2021च्या संपूर्ण वर्षात पेट्रोल - डिझेलच्या दरांत सतत वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्हींच्या दरांनी 100 रुपयांचा पल्ला ओलांडलेला आहे. नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम इंधनाच्या दरांवर होतो?

    आंतरराष्ट्रीय घडामोडी याला कारणीभूत असतात का? आणि देशातलं सरकार इंधनाच्या किंमती कमी करू शकतं का, जाणून घेण्यासाठी पहा सोपी गोष्ट

    संशोधन : अमृता दुर्वे

    लेखन,निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट - पर्यावरणविषयक जाहीर केलेली उद्दिष्टं भारत गाठू शकेल का?

    2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यवर आणले जाईल, असं मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या परिषदेत म्हटलंय. या परिषदेचं उद्दिष्ट 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरोवर आणण्याचं आहे. पण भारताने यासाठी आणखी 20 वर्षं लागणार असल्याचं म्हटलंय.

    कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. चीन आणि अमेरिका पहिल्या दोनमध्ये आहेत.
    भारताने आणखी काय जाहीर केलंय आणि ही उद्दिष्टं गाठण्याच्या मार्गात काय अडथळे असतील? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट
    संशोधन : टीम बीबीसी
    लेखन,निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    7 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners