
Sign up to save your podcasts
Or


ओमिक्रॉन या कोरोनाच्या सर्वांत नवीन व्हेरियंटमुळे जगात अनेक ठिकाणी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत सर्वांत गंभीर मानल्या गेलेल्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही हा व्हेरियंट जास्त वेगाने पसरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा व्हेरियंट किती घातक आहे? याच्यावर लशी काम करतील का? लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची ही उत्तरं.
संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
आतापर्यंत जगात 26 कोटी लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण, काही लोक असेही आहेत, खासकरून आरोग्यसेवक जे सतत कोव्हिड रुग्णांच्या संपर्कात आहेत. पण, विषाणूशी इतका जवळचा संबंध येऊनही त्यांना कोव्हिड झाला नाही. जगातील असे काही लोक संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत नवीन कोरोना लशीच्या संशोधनासाठी. कोरोनाच्या संपर्कात येऊनही कोव्हिड न झालेल्या लोकांचा अभ्यास करून संशोधकांनी नव्या कोरोना लशीचा फॉर्म्युला शोधला आहे. येणाऱ्या काळात हे संशोधन कोरोनाविरोधातील लढ्याला नवी दिशा देऊ शकतं. सोपी गोष्टमध्ये पाहूया ही नवी लस कसं काम करेल...
संशोधन - जेम्स गॅलगर
भारतात थंडीच्या काळात सहसा टोमॅटो स्वस्त होतात. पण सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती 70 ते 110 रुपये किलोदरम्यान आहेत. कशामुळे हे भाव इतके वाढले? हवामान बदलाचा पिकांवर कसा परिणाम होतोय? आणि या पुढच्या काळातही असंच होत राहणार का?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
23 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं जाहीर केलं की भारतात बिटकॉईनसारख्या डिजिटल करंसीविषयी कायदा बनवण्याच्या दिशेनं काम सुरू झालं आहे. यंदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भातलं विधेयक मांडलं जाणार आहे. क्रिप्टो करंसीवर कायद्याची गरज का आहे आणि मुळात क्रिप्टो करन्सी काय असते?
भारतात गावं-शहरं स्वच्छ ठेवण्याची मोहीम रुजावी यासाठी केंद्र सरकारनं 2016 साली स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सुरु केले. त्यात गेली सलग पाच वर्ष इंदूरनं बाजी मारली आहे.
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
पेटीएमची मालक कंपनी One 97 Communications च्या IPO साठी लोकांनी भरपूर बोली लावली. पण प्रत्यक्ष बाजारात त्याच्या शेअर्सची किंमत घसरली आणि अनेकांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला. पेटीएमला शेअर मार्केटमध्ये भाव का नाही मिळाला? येणाऱ्या काळात इंटरनेट कंपन्यांच्या IPO बद्दल काय सावधगिरी बाळगायची?
धर्मावरून होणारे वाद हे तसे जगाला नवीन नाहीत. इस्त्रायलमधला ज्यू-ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मियांमधला संघर्ष तसंच भारतातलं हिंदू-मुस्लीम द्वंद्वं अशी ज्वलंत उदाहरणं त्यासाठी देता येतील. या धार्मिक वादांमधून मोठी मोठी युद्धं घडलीत. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण पेटलंय. ईजिप्त, इस्त्रायल आणि मध्य-पूर्व देशांमध्ये सध्या नवा धार्मिक वाद उभा राहतोय तो अब्राहमला देव मानणाऱ्या अब्राहमी धर्मावरून. काय आहे हा नवीन धर्म? आणि त्यावरून वाद का निर्माण होतोय? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती, मालेगाव, नांदेड, औरंगाबादसह इतर काही ठिकाणी मुस्लीम संघटनांनी बंद पुकारला होता. काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनाला अमरावती, मालेगावसह काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. या हिंसाचाराच्या मागे रझा अकादमी असल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे.
रझा अकादमी म्हणजे काय आहे? ही संस्था कोणाची आहे? त्यांची कार्यपद्धती काय? रझा अकादमी राजकीय पक्षाशी संबधित आहे का? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट
संशोधन : दीपाली जगताप
निवेदन : अमृता दुर्वे
व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
हवामान बदलाचा मुद्दा निघाला की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका आणि धोरणं अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. ग्लासगोमध्ये नुकतीच पार पडलेली COP26 हवामान परिषदही त्याला अपवाद नव्हती.
संशोधन - नवीन खडका, रजनी वैद्यनाथन
जगातल्या कोणत्याही ठिकाणी असलेल्या प्रदुषणापेक्षा दहापट जास्त प्रदुषण उत्तर भारतात आहे. हे प्रदुषण पसरत जातंय आणि यामुळे भारतातील लोकांचं आयुष्य अडीच ते 10 वर्षांनी कमी होऊ शकतं असा अंदाज शिकागो विद्यापीठाच्या संशोधनाने व्यक्त केला आहे. भारतातील प्रदुषणामागे काय कारणं आहेत?
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners