
Sign up to save your podcasts
Or


नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातला वाद तसा जुना आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासूनच ही आग भडकली होती. पण नव्यानं ठिणगी पडली आहे ती संतोष परब हल्ला प्रकरणानं. हे प्रकरण काय आहे आणि त्याचा राणे-ठाकरे वादाशी काय संबंध आहे?
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आणि छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भरलेल्या धर्म संसदेत साधू-महंतांच्या वादग्रस्त विधानांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण धर्म संसद म्हणजे नेमकं काय असतं?
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
ऑनलाईन खरेदी किंवा कोणत्याही प्रकारच्या देवाण-घेवाणीसाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता का? एक क्लिक केलं आणि आवडता ड्रेस, आवडते शूज ऑर्डर झाले, ओटीटीचं सबस्क्रिप्शन झालं, इतकंच काय मोबाईलचं, लाईटचं बिलही भरलं गेलं अशी तुम्हाला सवय आहे का? मग आता तुम्हाला आपल्या सवयी बदल्याव्या लागतील. तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरण्याबदद्ल नवे नियम 1 जानेवारी पासून लागू होणार आहेत. कोणते आहेत नियम? जाणून घेऊया.
ओमिक्रॉन हा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आलाय हे तर एव्हाना तुमच्या कानावर आलं असेल. पण हा सौम्य व्हेरियंट आहे म्हणून अनेक जण त्याला हलक्यात घेत आहेत. पण पण ओमिक्रॉन खरंच सौम्य आहे का? जर तो सौम्य आहे, तर मग अनेक देशांतल लॉकडाऊन का लागत आहे? जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.
अनेकदा सेलेब्सवर, किंवा आपल्या नेत्यांवरही पैसा लपवल्याचे, करचोरीचे आरोप लागतात. असा बेकायदेशीर पैसा लपवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातलाच एक म्हणजे हवाला. हाही शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेलच. पण हा हवाला नक्की काय असतो? त्याचं रॅकेट कसं चालतं? आणि ही सिस्टिम नेमकी आली कुठून? जाणून घेऊया आजच्या बीबीसी मराठीच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन - अनघा पाठक
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन संसदेत भडकल्याची ही काही पहिली वेळ नव्हती. पण यावेळी त्या कशामुळे चिडल्या, ते नेमकं कळू शकलं नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सत्ताधारी बाकांमधून कुणी कमेंट केली, त्यामुळे त्यांना राग आला एवढंच कळलं. पण कुणी काय म्हटलं हे गदारोळात ऐकू आलं नाही. पण त्या चिडल्या त्याच सुमारास त्यांच्या सूनबाई आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची पनामा पेपर्स प्रकरणी एडीने चार तास चौकशी केली. पनामा पेपर्स काय आहेत आणि ऐश्वर्याने नेमकं असं केलंय ज्यामुळे त्यांची चौकशी होतेय? पाहूया सोपी गोष्टमध्ये.
लग्न करण्यासाठी मुलींचं कायदेशीर वय आता 18 वरून 21 करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि आता हे बिल संसदेत मांडलं जातंय. पण या निर्णयाला देशातले अनेक राजकीय पक्ष विरोध करत आहेत. मुलीचं लग्नाचं वय नक्की का वाढवलं, मोदी सरकारच्या या निर्णयाचा राजकीय पक्ष का विरोध करत आहेत? आणि मुख्य म्हणजे याने खरंच स्त्री पुरुष समानता येईल का? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
पुढच्या दोन दशकांमध्ये चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकून जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था होईल असा तज्ज्ञांचा होरा आहे. चीनने मिळवलेलं हे यश मागच्या वीस वर्षांत मिळवलेलं आहे. पण, सध्या अमेरिका आणि इतर युरोपीयन देश तसंच गरीब देशांनाही ते सलतंय. असं नेमकं का? चीनच्या या घोडदौडीत जगाला नेमका काय धोका आहे? जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - फैसल इस्लाम, ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
फेब्रुवारी 2022मध्ये चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पण चीनमधल्या शिनजियांग प्रांतामध्ये वीगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आपण या स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बहिष्कार टाकत असल्याचं अमेरिका, युके, कॅनडाने म्हटलंय.
धोरणात्मक किंवा राजनैतिक बहिष्कार म्हणजे नेमकं काय? त्यातून काय साध्य होईल? आणि या सगळ्यावर चीनचं म्हणणं काय आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट
संशोधन : टीम बीबीसी
काश्मीर खोऱ्यात श्रीनगर शहराच्या बाहेर झेवनमध्ये एका पोलीस व्हॅनवर झालेल्या कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले. काश्मीरमध्ये मागच्या काही महिन्यात सामान्य नागरिक आणि पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे. काश्मीर पोलिसांच्या मते आंतरराष्ट्रीय आतिरेकी संघटनांचे छोटे छोटे गट हे संघटित हल्ले घडवून आणत आहे. ही झाली पोलिसांची बाजू. पण, काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय? सामान्य नागरिक आणि पोलिसांवर असे हल्ले का होतायत? पोलिसांनी जबाबदार धरलेली काश्मीर टायगर्स ही संघटना नेमकी काय आहे? पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners