
Sign up to save your podcasts
Or


व्होडाफोन आयडिया लिमिटेडमधले 35.8% शेअर्स सरकारला देण्याच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. BSNL - MTNL ची वाईट असताना दुसरीकडे व्होडाफोन - आयडियामध्ये सरकारी भागीदारी कशाला? नेमकी ही काय भानगड आहे? यात Vodafone-Idea कंपनीचा काय फायदा? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
कोव्हिड 19मुळे झालेला लॉकडाऊन, कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट यातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण अजूनही पूर्वीइतकं नाही. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा रोजगारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. भारतातलं नोकऱ्यांचं संकट हे वाटतं त्यापेक्षा अधिक गहन असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतातल्या बेरोजगारीचा दर डिसेंबर 2021मध्ये 8% पर्यंत गेला होता. देशातला रोजगार आणि पगारी नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. काय आहे यामागचं कारण? समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन: सौतिक बिस्वास आणि टीम बीबीसी
मागच्या 24 तासात भारतात एक लाखांच्या वर नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. थोडक्यात रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा जोमाने वाढतोय. आणि यावेळी आधी लस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग झाल्याच्या केसेस आहेत. जगभरातच ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारानंतर लस घेतल्यानंतर झालेला ब्रेकथ्रू संसर्ग पाहायला मिळाला आहे. लस घेतल्यावरही कोरोना संसर्ग का होतो? तिसरा लशीचा डोस त्यावर प्रभावी ठरेल का? पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीस लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
1984 साली इंदिरा गांधींची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर Special Protection Groupची स्थापना झाली. त्यांचं काम कसं चालतं? त्यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाकडे असते?
इंटरनेटवर फ्री अॅप सुरू करून त्यावर प्रथितयश मुस्लीम महिलांबद्दल अश्लील मजकूर छापणे आणि त्यांना ट्रोल करण्याचं आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी कारवाई करत 18 वर्षांची एक तरुणी आणि 21 वर्षांच्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. लहान वयात ही मुलं असे उद्योग का करतात? मुस्लीम समाजातल्या मुलींवर याचा काय परिणाम होतोय, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
[https://www.youtube.com/watch?v=5NZkcGZ5XL8]
संशोधन - ऋजुता लुकतुके, मयांक भागवत
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
Twitter Tags
@MumbaiPolice
@priyankac19
@priyankac19
@RujutaLuktuke
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट आली आहे. पण रुग्णालयात दाखल होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे तीव्र संसर्गजन्य असूनही ओमिक्रॅान व्हेरियंट कोरोना विरोधातील लढाईत 'नॅचरल व्हॅक्सीन' असल्याचा दावा काहींनी केला आहे. पण अनेक तज्ज्ञांनी तो खोडून काढला आहे.
संशोधन - मयांक भागवत
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले
2022 सालात आणखी कुठला कोरोना व्हेरियंट त्रास देईल की, लशीमुळे सगळे सुरक्षित असू? वर्क फ्रॉम होममध्ये काही बदल होईल का? मेटाव्हर्स, 4जी यामुळे आपलं जग किती बदलेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याचीच उत्तरं शोधूया आजच्या सोपी गोष्टमध्ये…
[https://www.youtube.com/watch?v=RHqZmep_MlA]
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत केलेलं हे वक्तव्य. सुधीर मुनंगटीवारांनी प्रश्न विचारला की एखादा व्यक्ती LGBTQA समुदायाचा आहे की नाही हे कसं कळणार? एखाद्या पुरुषाला पुरुषाबद्दल आकर्षण आहे, याचं सर्टिफिकिट कोण देणार? त्याची व्याख्या काय? सुधीर भाऊंना पडलेल्या या प्रश्नांची सोप्या भाषेत वैज्ञानिक आणि कायदेशीर उत्तर शोधू या, आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन आणि निवेदन - अनघा पाठक
कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता अनेक जाणकारांनी मांडली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारनं ओमिक्रॅान व्हेरियंटचा प्रसार कुठे आणि किती प्रमाणात झालाय याचा शोध सुरू केला आहे. सर्वेक्षणाचं हे काम कसं सुरू आहे?
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners