
Sign up to save your podcasts
Or


कर्नाटकच्या दोन शहरांमधून सुरू झालेला वाद आता देशभरात पोहोचलाय. मुलींनी कॉलेजमध्ये हिजाब घालून यायचा की नाही यावरून वादंग पेटलाय. हिजाब घालणं हा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग आहे. पण ते शैक्षणिक संस्थेच्या परिसरात घालण्याचाही अधिकार आहे का? त्यावर निर्बंध घालता येऊ शकतात का?
लता मंगेशकर आणि आशा भोसले, सख्ख्या बहिणी आणि श्रेष्ठ गायिका. एकाच काळात हिंदी, मराठी तसंच विविध भाषांमध्ये संगीत क्षेत्रात दोघी कार्यरत होत्या. पण या दोघींमध्ये स्पर्धा होती का? कधी एकमेकींमुळे संधी हुकली असं घडलं का?
संगीत सौजन्य - सारेगामा, सोनी
भारत सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी देणार हा प्रश्न गेली काही वर्षं विचारला जातोय. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीने त्यासंर्भातला अहवाल 2013 साली सादर केला. केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने त्यासंदर्भातली शिफारस करणारा अहवाल मोदी सरकारला काही वर्षांपूर्वीच सादर केला. तेव्हापासून हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सरकार सांगत आलंय. मग गोष्टी कुठे अडल्या आहेत?
महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाबरोबरच वाईनच्या आरोग्यावर होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांची जोरदार चर्चा सुरू झाली. वाईन पिणं आरोग्याला पोषक की घातक? किती प्रमाणात अल्कोहोल पिणं सुरक्षित असतं? या सगळ्यामागे शास्त्रीय आधार आहे का याची ही सोपी गोष्ट
लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
तुम्ही नोकरी करत असाल तर बजेटमध्ये तुमची नजर आयकराबद्दलच्या घोषणांवर असेल. इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढतेय का हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल. पण यंदा तसं झालं नाही, खरंतर गेली काही वर्षं ही सवलत मिळालीच नाहीय. यामुळे पगारदारांचं, मध्यमवर्गीयांचं नुकसान झालंय का? विरोधक, सरकार आणि तज्ज्ञ काय म्हणतात? ऐका ही सोपी गोष्ट.
लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी सादर केलेलं बजेट पेपरलेस होतं. म्हणजे, नेहमीसारखा कागद आणि फायलींवर पैसा खर्च न करता सगळे मंत्री आणि सभागृहाला चक्क ऑनलाईन कॉपी देण्यात आली. यावर्षीचं बजेट पुन्हा एकदा पेपरलेस तर होतंच. शिवाय ते डिजिटलही होतं असं म्हणावं लागेल. कारण, बँकिंगपासून शेती आणि आरोग्य क्षेत्रातही सरकारने डिजिटल व्यवहारांवर आणि सोयींवर भर द्यायचं ठरवलंय. इतकंच नाही तर देशात पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणाही सरकारने केलीय. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बघूया डिजिटल क्षेत्रात नेमके काय बदल होणारएत.
रेल्वे भरती परिक्षेतील गोंधळामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश बरोबरच देशभरातले विद्यार्थी सध्या चिडलेले आहेत. आधीच कोरोना काळात कमी झालेला रोजगार आणि त्यातच सरकारी भरती प्रक्रियेतल्या गोंधळामुळे तरुणांना संधी गमावाव्या लागत आहेत. त्यातच राष्ट्रीय पातळीवर जाहीर झालेल्या आकडेवारीत डिसेंबर 2020मध्ये देशात बेरोजगारीचा दर आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 7.91% असल्याचं समोर आलं आहे. देशात तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीएत? एकटा कोरोना याला जबाबदार आहे का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - सौतिक बिश्वास, ऋजुता लुकतुके
रशिया आणि यु्क्रेन दरम्यानचा तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रशियाने युक्रेन सीमेवर तब्बल एक लाख सैनिक तैनात केल्याची बातमी आहे. त्यामुळे सध्या दोघांमध्ये युद्धविराम असला तरी रशिया कुठल्याही क्षणी युक्रेनवर प्रत्यक्ष हल्ला करेल अशी भीती पाश्चात्य देश आणि अमेरिकेला वाटत आहे. रशिया इतका आक्रमक का आहे? पाश्चात्य देश या मुद्यावर रशियाविरोधात का एकवटले आहेत? आणि रशिया-युक्रेन युद्ध झालंच तर जगावर, भारतावर त्याचा काय परिणाम होईल जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - डेव्हिड ब्राऊन, ऋजुता लुकतुके
अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतीजैविक औषधांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खरंतर क्रांती घडून आली. मलेरिया, न्युमोनिया यासारखे आजार एकेकाळी जीवघेणे ठरत होते. पण, त्यातून लोकांचा जीव वाचला. पण, यात अँटिबायोटिक्सचा जर अतीवापर किंवा गैरवापर झाला तर काय होतं याचा अनुभव आता जग घेतलंय. औषधांची परिणामकारकता कमी होऊन आपलं शरीर रोगांना प्रतिकार करणं थांबवू शकत नाही. त्यामुळे अँटिबायोटिक औषध घेऊनही लोकांचा मृत्यू ओढवतो. २०१९मध्ये जगभरात बारा लाख लोकांचा मृत्यू हा न्युमोनिया किंवा इतर श्वसनाचे विकार यामुळे झाला आहे. अँटिबायोटिक्सच्या अतीवापराचाच हा परिणाम असल्याचं संशोधक मानतात. यावर उपाय काय, पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - फिलिपा रॉक्सबी, ऋजुता लुकतुके
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners