
Sign up to save your podcasts
Or


काश्मिरी पंडितांचा मुद्दा सध्या चर्चिला जातोय. त्यांना काश्मिरातून पलायन करायला भाग पाडण्यात कोणत्या संघटनांचा हात होता? काश्मिरी पंडितांविरुद्ध हिंसाचार कुणी घडवून आणला होता? काश्मिरमध्ये हिंसाचार करणाऱ्या या 5 कट्टरतावादी संघटनांबद्दल जाणून घ्या.
मुंबईत पारा चढलाय. मुंबईकरांना उन्हाचे चांगलेच चटके जाणवतायत. अशावेळी उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोकचीही भीती असते. हे काय असतं? त्यापासून कसं वाचायचं? पाहा ही सोपी गोष्ट.
19 जानेवारी 1990 हा दिवस काश्मिरी पंडितांसाठी खूप वेदनादायी आहे. यात दिवशी काश्मिरातून पंडितांचं पलायन सुरू झालं. पाकिस्तानधार्जिण्या घोषणा आणि हिंदूंना धमकवणाऱ्या घोषणांचा जोर वाढत असताना जीव मुठीत धरून अनेक काश्मिरी हिंदू कुटुंबं काश्मीर खोरं सोडून गेली. हे सगळं का आणि कसं झालं? सोपी गोष्टच्या या भागातून जाणून घ्या.
महाराष्ट्राचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला. महाराष्ट्राला 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या. काही जुन्या, काही नव्या. या अर्थसंकल्पाचा अर्थ आणि त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम जाणून घ्या 7 सोप्या मुद्द्यांमध्ये.
भाजप नेत्यांना संपवण्यासाठी राज्य सरकारने कट केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्या एका जुन्या प्रकरणात मकोका लावण्यासाठी राज्य सरकारने वकिलांना हाताशी धरून कट रचला असा फडणवीसांचा आरोप आहे. पण हे मूळ प्रकरण काय होतं?
गंगूबाई काठियावाडी, झुंड आणि पानवखिंड हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात सुरू आहेत. पण त्याचवेळी यांच्याभोवती काही नवीन प्रश्न उभे राहिले. कोणत्या चित्रपटाला पसंती द्यायची यावरून सुरू झालेली चर्चा जातीय अस्मितांवर कशी पोहोचली? बहुजन विरुद्ध अभिजन असं या सगळ्याला स्वरुप का आलं? जाणून घेऊ या सोपी गोष्टच्या या भागातून.
युक्रेन रशिया युद्धात रशिया अण्वस्त्र वापरेल का ही भीती व्यक्त केली जात आहे. अण्वस्त्र आहेत म्हणून एखाद्या देश ती सहज वापरू शकतो का? जगात असे कोण लोक आहेत ज्यांच्याकडे ती वापरण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या या सोपी गोष्ट मधून.
संशोधन - टीम बीबीसी
ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातलं सख्य जगजाहीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्घाटनाला, राज्यपालांना आपलं अभिभाषण अर्ध्यात सोडून जावं लागलं. राज्य सरकार राज्यपालांबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रारही देणार आहे. या तक्रारीतून काय साध्य होईल? राज्य सरकारकडे राज्यपालांना पदावरून बाजूला करण्याचा अधिकार आहे का?
रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतीच देशाच्या अण्वस्त्र यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश त्यांना आहेत. पण, ही धमकी आहे की, पुतिन खरंच अण्वस्त्राचा वापर करायला मागे पुढे पाहणार नाहीत. या दोन्ही परिस्थिती या युद्धाचं स्वरुप काय असेल. देशात किती देश आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - टीम बीबीसी
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners