सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: जेम्स लेन यांच्या पुस्तकाचा वाद पुन्हा का सुरू झाला?

    13 फेब्रुवारी 2003 या दिवशी ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एक पुस्तक प्रकाशित केलं आणि महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले. पुस्तकाचं नावं होतं - शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया आणि लेखक होते अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन. जेम्स लेन कोण आहेत? शिवाजी महाराजांवर त्यांनी काय लिहिलं, ज्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण बदललं? राज ठाकरेंनी हा मुद्दा पुन्हा का काढलाय? या सगळ्या उत्तरांसाठी पाहा आजची सोपी गोष्ट.

    संशोधन – ओंकार करंबेळकर

    निवेदन - विशाखा निकम

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: अझान आणि मशिदीतल्या भोंग्याविषयी नियम काय सांगतात?

    लाऊडस्पीकरवरून दिली जाणारी अझान हा केवळ भारतातच नाही तर अगदी काही मुस्लिम देशांतही वादाचा विषय ठरला आहे. धार्मिक स्थळी ध्वनिक्षेपक किंवा कुठलीही साऊंड सिस्टिम वापरण्याविषयी भारतातले नियम काय सांगतात?

    संशोधन – जान्हवी मुळे, दीपाली जगताप
    निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: ब्राह्मणांनी मांसाहार का आणि कधी सोडला?

    दिल्लीत राम नवमी आणि चैत्र नवरात्रीत मांसाहारावर बंदीच्या मुद्द्यावरून वाद रंगला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तर मांसाहारावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात संघर्षही झाला. पण शाकाहारी हिंदू किंवा जैन विरुद्ध मांसाहारी मुस्लीम, अशी भारतीय खाद्यसंस्कृतीची विभागणी करता येत नाही आणि सगळेच हिंदू शाकाहारी आहेत असंही नाही.

    संशोधन – अपर्णा अल्लूरी, जान्हवी मुळे

    निवेदन - जान्हवी मुळे

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात सैन्यभरती का थांबली आहे आणि लष्करकपात का होऊ शकते?

    14 लाख कर्मचारी असलेलं भारतीय सैन्य हे रोजगारनिर्मितीच्या बाबतीत देशातच नाही तर जगातही आघाडीच्या संस्थापैकी एक आहे. लष्करातली नोकरी अभिमानाची आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यानं मोठ्या प्रमाणात भारतीय तरूण सैन्यात जायला उत्सुकही असतात. पण गेली दोन वर्ष सैन्यभरतीच झालेली नाही.

    संशोधन – सौतिक बिस्वास

    निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : राजपक्षे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे देश डबघाईला आल्याचा आरोप का होतोय?

    श्रीलंकेतल्या आर्थिक परिस्थितीच्या विरोधात श्रीलंकेत निदर्शनं झाही. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षेंनी आणीबाणी लावली आणि नंतर आणखी निदर्शनांनंतर ती उठवलीही. याचा राजकीय फटकाही त्यांना आणि पक्षाला बसला कारण अर्थमंत्र्यांसह या मंत्रिमंडळातल्या अनेकांनी राजीनामा दिला.

    अनेक स्थानिक श्रीलंकन या परिस्थितीसाठी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि एकूणच राजपक्षे कुटुंबाला दोषी धरतायत.
    राजपक्षे कुटुंबातलं कोण-कोण या सरकारमध्ये कोणत्या पदावर आहे, किंवा होतं...आणि या सगळ्याचा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालाय?

    संशोधन : हर्षल आकुडे

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये फार आघाडी का घेता आली नाही?

    रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारीला हल्ला केला. या युद्धाला आता 44 दिवस झाले आहेत. पण इतक्या दिवसांच्या संघर्षानंतरही रशियाला युक्रेनमध्ये आतपर्यंत शिरता आलेलं नाही. रशियाच्या तुलनेत लहान असणाऱ्या युक्रेनवर वरचढ ठरणं रशियाला इतकं कठीण का गेलं?

    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन : टीम बीबीसी

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : अरविंद पारेकर

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : भाजपच्या स्थापनेला होता मुस्लीम प्रमुख पाहुणा

    गेल्या चार दशकांत भारतीय जनता पक्षानं भारतीय राजकारणात प्रमुख राजकीय पक्ष म्हणून आपलं स्थान बळकट केलं आहे. पण या पक्षाची स्थापना कशी झाली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उदरातून जन्मलेला जनसंघ आणि जनसंघाच्या कुशीची उब आणि जनता पार्टीतली घुसळण या दोहोंतून भाजपचा जन्म झाला, असपण इतकंच सांगावं, इतकाच काही मर्यादित इतिहास नाही.

    संशोधन - नामदेव काटकर

    निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले जातात, कारण...

    देशात भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या सर्वाधिक केसेस कर्नाटकात नाही, तर महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्या आहेत. यामागे काय कारणं असावीत?

    संशोधन – जान्हवी मुळे, मेधावी अरोरा
    निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : पाकिस्तानचा पंतप्रधान 5 वर्षं पदावर का टिकत नाही?

    पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून, म्हणजे 1947 पासून आजपर्यंत तिथे कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाहीये. भारतात नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदींसारखे नेते कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुन्हा निवडून आले, तेव्हा शेजारच्या देशात हे का होऊ शकलं नाही? बीबीसी मराठीवर पाहूया सोपी गोष्ट क्रमांक 569 मध्ये.

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकार अमेरिका किंवा रशियापैकी एका देशाची बाजू घेईल?

    रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारताने अत्यंत सावध भूमिका घेतलीय. आपण संयुक्त राष्ट्रांमधल्या प्रस्तावांवर कोणत्याच बाजूने मत दिलेलं नाही. आपण रशियाची उघडपणे निंदा केली नाही, पण युक्रेनलाही निराश केलं नाही. रशिया आणि अमेरिका जगातल्या विविध राष्ट्रांना आपापल्या बाजूने वळवू पाहतायत. भारत ही तारेवरची कसरत कशी पार पाडेल? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन,लेखन,निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners