
Sign up to save your podcasts
Or


गर्भपात करण्याचा अधिकार किंवा हक्क महिलांना असावा का, यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. निमित्त आहे अमेरिकेत फुटलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या ड्राफ्टचा. तिथे न्यायालयाने आपला निकाल अजून दिलेला नाही. पण, हा ड्राफ्ट तशाच्या तशा अंमलात आला तर अमेरिकन महिलेला असलेला हा अधिकार काढून घेतला जाईल. भारतातही गर्भपात कायदा अस्तित्वात आहे. पण, त्यात निर्णयाचं किती स्वातंत्र्य महिलांना आहे हा प्रश्नच आहे. सोपी गोष्टमध्ये याच मुद्यावर चर्चा करूया…
संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ येत्या चार तारखेपासून बाजारात येत आहे. भारतातील आतापर्यंतची हा सगळ्यात मोठा आयपीओ असला तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे आर्थिक अस्थिरता वाढलेली असताना एलआयसी कंपनी शेअर बाजारात उतरत आहे. अशावेळी या आयपीओमध्ये सहभागी व्हावं का? गुंतवणुकीची रणनिती नेमकी काय असावी, आज बघूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या मृत्युला आता सोळा वर्षं झाली. पण, अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत - त्यांचाच लहान भाऊ प्रवीणने त्यांची हत्या का केली? प्रवीण महाजन यांनी तुरुंगातून लिहिलेलं पुस्तक ‘माझा अल्बम’ आणि खटल्या दरम्यान कोर्टात नोंदवण्यात आलेल्या साक्षी यांच्या आधाराने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - मयांक भागवत
ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क पुढची कोणती कंपनी घेणार, याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी एक ट्वीट करून सांगितलंय की, "मी कोका कोला विकत घेणार आणि त्यात पुन्हा कोकेन टाकणार."
संशोधन - अनघा पाठक
केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली, पण काही राज्यांनी व्हॅट कमी न केल्यामुळे पेट्रोलचे भाव जास्त आहेत, असं मोदी म्हणतायत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदींच्या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. ते म्हणतात की पंतप्रधान चुकीची माहिती पसरवतायत. खरं कुणाचं? पेट्रोल, डिझेलच्या किमती कुणामुळे कमी होत नाहीयत?
महागाईचा भडका उडालाय, हे आपण रोज बातम्यांमध्ये ऐकतो, वाचतो. पण हे किती शब्दशः खरं आहे बघा ना. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत, खाण्या पिण्याच्या वस्तूंचे भाव वाढलेत आणि या आगीत आता आणखी तेल ओतलं जाईल की काय, अशी भीती आहे. खायच्या तेलाचे भाव किलोमागे 3 ते 5 रुपयांनी वाढतील, अशी चिन्हं आहेत. याचं कारण म्हणजे आपल्याकडे आयात होणाऱ्या पाम तेलाची आवक कमी होऊ शकते.
इंडोनेशियाने तिथून निर्यात होणाऱ्या पाम तेलावर कडक निर्बंध लादलेत. आता पुढे काय होणारे? फक्त खायचं तेल महागेल की आणखीही काही? भारताने गेल्या वर्षी मिशन पाम तेल सुरू केलं होतं त्याचं काय झालं? पाहणार आहोत आजची सोपी गोष्ट
संशोधन / लेखन - सिद्धनाथ गानू
इलॉन मस्कनी ट्विटर विकत घेतलं. मुक्त अभिव्यक्तीचा पुरस्कार करणारे मस्क आता लोकांना ट्विटरवर वाटेल ते बोलण्याची मुभा देतील का? सगळे निर्बंध उठवले जातील का? मस्कच्या मालकीचं ट्विटर पूर्वीपेक्षा वेगळं असेल का?
संशोधन, लेखन - सिद्धनाथ गानू
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मरीन ल पेन यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पेन यांच्या भूमिका मुस्लीमविरोधी असल्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. मॅक्रॉन यांनी महागाईचा फटका बसू न देता उजव्या आणि डाव्या दोन्ही विचारसरणींच्या पक्षांचा पराभव कसा केला? पाहा ही सोपी गोष्ट.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि त्यांची वक्तव्ये चर्चेत आहेत. राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमागचं नेमकं कारण काय आहे आणि राज ठाकरे यांची वाटचाल बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने सुरू आहे का? त्याचे नेमके परिणाम काय असू शकतात?
संशोधन – हर्षल आकुडे
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
लोकसभेनं संमत केलेल्या द क्रिमिनिल प्रोसिजर (आयडेंटिफिकेशन) या विधेयकावरून वाद सुरू आहे. पण हा कायदा बेकायदेशीर असल्याचा आणि त्यामुळे नागरीकांच्या खासगीपणाच्या हक्कावर गदा येत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर सरकारचं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्था, गुन्ह्यांचा तपास आणि खटल्यांचा वेगानं निकाल लागण्यात यानं मदत होईल.
संशोधन – टीम बीबीसी, निवेदन - जान्हवी मुळे, एडिटिंग – अरविंद पारेकर
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,578 Listeners

1,044 Listeners

5,517 Listeners

1,805 Listeners

1,801 Listeners

1,025 Listeners

1,979 Listeners

3,225 Listeners

725 Listeners

1,006 Listeners

1 Listeners