सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत का वाढतायत?

    गेले 9 दिवस देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ होताना आपण पाहातोय. कधी 50 पैसे तर कधी 75 पैसे तर कधी काही रुपयांमध्येही ही वाढ होतेय. पण गेल्या 9 दिवसांत 8 वेळा ही वाढ का झालीये? एकीकडे रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे देशांतर्गत कारणं यामुळे या किंमतीत वाढ होतेय का?

    संशोधन, लेखन, निवेदन – ओंकार करंबेळकर

    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: हिंदूंना भारतातल्या काही राज्यांमध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळू शकतो का?

    सध्या सर्वोच्च न्यायालयात एका देशांतल्या काही राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या याचिकेवर सुनावणी चालू आहे. आठ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत असं २०११ ची जनगणना सांगते. मग हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा अधिकार कोणाचा? केंद्र सरकारचा की राज्यांचा? या विषयावर ही सोपी गोष्ट.

    8 min
  • काश्मिरी पंडितांच्या पलायनासाठी जबाबदार कोण? काँग्रेस, भाजप की इतर कुणी? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    1990 मध्ये काश्मीर खोऱ्यातून पंडितांनी पलायन केलं. यासाठी नेमकं जबाबदार कोण होतं? भाजपच्या पाठिंब्यावर तेव्हा व्ही. पी. सिंह केंद्रात सत्तेत होते, पण काश्मिरातली परिस्थिती ही काही एका वर्षाचा परिणाम नव्हती. या सगळ्या घटनांमागे काय पार्श्वभूमी होती?

    संशोधन, लेखन, निवेदन - मयुरेश कोण्णूर

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    10 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : श्रीलंकेत महागाई इतकी का भडकली आहे?

    महागाईचा प्रश्न भारतात त्रास देतो आहेच, पण श्रीलंकेत परिस्थिती इतकी गंभीर आहे की गेल्या एका आठवड्यात 16 श्रीलंकन नागरिक पळ काढून भारतात आलेत. ते आता तामिळनाडूत पोलिसांच्या ताब्यात आहेत. आपल्या शेजाऱ्यावर इतकी वाईट परिस्थिती कशी ओढवली?

    संशोधन – टीम बीबीसी
    लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार का होतो?

    पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात जो हिंसाचार घडला त्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर संशयित हल्लेखोरांच्या घरांना आग लावली गेली. एका घरात 8 लोक असताना त्यांचं घर जाळलं गेलं. सहा महिला आणि 2 मुलांचा जळून मृत्यू झाला. बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराचा इतिहास आहे. काय आहे हा प्रकार?

    संशोधन – टीम बीबीसी

    लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : उद्धव ठाकरेंप्रमाणे नातेवाईकांमुळे अडचणीत आलेले मुख्यमंत्री कोण?

    मेव्हण्यांवर ईडीचे छापे पडले आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी व्हायला लागली. यापूर्वी महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री त्यांच्या नातेवाईकांसंबंधीच्या प्रकरणांमुळे आपल्या पदावरून पायउतार झालेले आहेत. ही प्रकरणं काय होती? कोण होते हे मुख्यमंत्री? पाहा.

    संशोधन – नीलेश धोत्रे
    लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : व्लादीमीर पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय?

    व्लादीमीर पुतीन युक्रेन आक्रमणाबद्दल नेमका काय विचार करतायत यावर अवलंबून आहे की हे युद्ध कसं आणि कधी संपेल. पुतीन म्हणतायत की हे आक्रमण रशियाने नाही, युक्रेनने सुरू केलं. पुतीन यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? जगभरातले गुप्तहेर याची उकल करण्याचा प्रयत्न करतायत. या गुप्तहेरांना काय सापडलं?

    संशोधन - गॉर्डन कॉरेरा
    लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : आशा सेविकांना किटमध्ये रबरी लिंग देण्यावरून वाद का झाला?

    आशा सेविकांना कुटुंब नियोजन आणि लैंगिक आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी जी किट्स दिली जातात त्यात एक रबरी लिंग देण्यात येण्यावरून वाद झाला आहे. अशाप्रकारची मॉडेल्स वापरणं आशा सेविकांना अवघडल्यासारखं करू शकतं असा काहींचा दावा आहे तर मुळात यात नवीन काही नसून यापूर्वीही अशाप्रकारची मॉडेल्स वापरली जात होती असं प्रशासन आणि काही आशा सेविकांनी सांगितलं आहे. काय आहे हा वाद?

    संशोधन – बीबीसी मराठी
    लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    7 min
  • गोड पदार्थ, साखर खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडतं का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    साखर सोडली की आरोग्य सुधारतं असा अनेकांचा समज आहे. अनेक लोक साखरेला आपला शत्रू मानतात. निरोगी राहण्यासाठी साखरेचा त्याग करायला हवा का? साखर खाल्ल्यामुळे आजार होतात का? तज्ज्ञ काय सांगतात? ऐका आजची सोपी गोष्ट.

    संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : अजित पवारांनी अर्थसंकल्पात शिवसेनेला कमी वाटा दिला का?

    महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी शिवसेनेला सर्वांत कमी वाटा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र भरभरून बजेट मिळालं असा दावा देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत चर्चेदरम्यान केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपावरून कुरबूर का आहे? याचे काय परिणाम होतील?

    संशोधन - दीपाली जगताप
    लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners