सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : युक्रेन रशिया युद्धाचे तुमच्यावर हे 5 परिणाम होऊ शकतात

    युक्रेन आणि रशियात युद्ध भडकलंय. युरोपाबरोबरच सगळ्या जगाचं लक्ष त्याकडे लागलंय. पण इथे भारतात बसून तुमच्या माझ्यावर याचे परिणाम कसे होऊ शकतात? आपला याच्याशी थेट संबंध कसा येणार आहे? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागामधून.

    संशोधन – सरोज सिंह

    लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू
    एडिटिंग - निलेश भोसले

    5 min
  • व्लादिमीर पुतिन यांना युक्रेन का जिंकायचंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

    दोन शेजारी देशांमधल्या कुरबुरी तशा नव्या नाहीत. पण युक्रेन आणि रशियामधला संघर्ष युद्धाच्या शक्यतेपर्यंत पोहोचला आहे. त्यात पुतिन यांनी युक्रेनमधल्या दोनेस्क आणि लुहांस्क या दोन भागांचं स्वातंत्र्य मान्य केलं आहे. तसंच युक्रेन स्वतंत्र राष्ट्र म्हणून कधी अस्तित्वात नव्हताच अशा आशयाचं विधानही त्यांनी केलंय. पुतिन यांच्या मनात युक्रेनविषयी एवढी चीड का आहे?

    लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग – नीलेश भोसले

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: रशिया ‘या’ तीन मार्गांनी रशियावर हल्ला करू शकतो…

    रशियाने युक्रेनमध्ये रणगाडे घुसवल्याचा आरोप करत आता ग्रेट ब्रिटनने रशियावर निर्बंध लादले आहेत. युरोपमध्ये आता खऱ्या अर्थाने युद्धाचे ढग जमू लागले आहेत. रशियाने मात्र आपली भूमिका हल्ला करण्याची नाही हीच ठेवली आहे. पण, त्याचबरोबर युक्रेन सीमेवर दोन लाखांच्या जवळपास सैनिक उभे करत त्यांनी आपली युद्धसज्जताही दाखवून दिली आहे. जर रशियाने खरंच हल्ला केला तर त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय आहेत हे युद्ध रणनिती तज्ज्ञांशी बोलून बीबीसीने जाणून घेतलं आहे. पाहूया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - टीम बीबीसी
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: रशिया जगावर महायुद्ध लादत आहे का?

    ‘रशिया, युरोप आणि जगावर दुसऱ्या महायुद्धानंतरचं मोठं युद्ध लादण्याच्या उंबरठ्यावर आहे,’ असं मोठं विधान ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष झालाच तर तो अख्खं जग व्यापेल अशी भीती पाश्चात्य देशांमध्ये स्पष्ट दिसतेय. नेमकं या दोन देशांमध्ये काय सुरू आहे, युद्ध होईल का, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - टीम बीबीसी

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - निलेश भोसले

    6 min
  • तुमच्याबद्दल अप्रिय माहिती इंटरनेटवरून डिलिट करता येईल का? । सोपी गोष्ट पॉडकास्ट

    ‘राईट टू बी फरगॉटन’ म्हणजे विसरण्याच्या अधिकारावर सध्या मीडियामध्ये भरपूर चर्चा होतेय. गोपनीयतेच्या अधिकाराशी मिळताजुळता असा हा प्रकार आहे. तुमच्या बद्दल इंटेरनेटवर उपलब्ध असलेली विशिष्ट जुनी सार्वजनिक माहिती डिलिट करण्याचा हा अधिकार आहे. आणि असा कायदा युरोपीयन देशांमध्ये अस्तित्वातही आहे. अशा कायद्याची आवश्यकता काय आणि भारतात केंद्रसरकारची यावर काय भूमिका आहे आज बघूया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - गीता पांडे
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत खरंच लाहोर काबीज करू शकला असता का?

    भारतीय सैन्याकडे एकदा सोडून तीनदा लाहोर जिंकण्याची संधी होती…पण, काँग्रेसनं ती गमावली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये निवडणूक प्रचारसभे दरम्यान केलं आहे. आता निवडणुकीचा प्रचार आहे म्हटल्यावर हे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित असणार हे आपण धरून चालूया. पण, इतिहासाच्या कसोटीवर हे विधान कितपत तग धरू शकतं. ज्या तीन युद्धांचा दाखला मोदींनी दिलाय तेव्हा खरंच भारतीय सैन्य लाहोर काबीज करण्याच्या जवळ होतं का, आणि समजा केलं असतं तर ते टिकवून ठेवू शकलो असतो का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग - अरविंद पारेकर

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: स्लीप ॲप्निया आजार जीवघेणा आहे का?

    ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचा मृत्यू स्लीप ॲप्नियामुळे झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे. त्यानंतर या आजाराविषयी सगळीकडे कुतुहल निर्माण झालं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर स्लीप ॲप्निया म्हणजे झोपेत श्वास घ्यायला अडथळा होणं. घोरणं हा ही त्याचाच एक सौम्य परिणाम आहे. पण म्हणजे या आजारामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? स्लीप ॲप्नियाबद्दल जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - टीम बीबीसी
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: एबीजी शिपयार्ड कंपनीने बँकांना कसं फसवलं?

    विजय माल्या, नीरव मोदी यांच्या कर्ज घोटाळ्यालाही मागे टाकेल असा 22,492 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा मागच्या आठवड्यात समोर आला आहे. आणि तो घडवून आणणारे एबीजी शिपयार्ड कंपनीने मालक आणि संचालक देश सोडून फरारही झाले आहेत. हा देशातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बँक घोटाळा मानला जातोय. एबीजी कंपनीने एकूण 28 बँकांची फसवणूक कशी केली, समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - ऋजुता लुकतुके
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर

    8 min
  • शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राजकारण का होतंय? | सोपी गोष्ट पॉडकास्ट

    अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्याचं प्रकरण अजून मिटलेलं नाही. त्यात गेल्या आठवड्यात तिथल्या महापालिका आयुक्तांवरही शाईफेक करण्यात आली. नेमका वाद काय आहे आणि पुतळे उभारण्याविषयीची नियमावली काय सांगते? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन – जान्हवी मुळे, नितेश राऊत
    लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग – अरविंद पारेकर

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: गौतम अदानींनी अंबानींना कसं मागे टाकलं?

    भारतातील आणि आशियातीलही सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हे ठरवण्यासाठी सध्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यामध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे.

    29 जानेवारी आणि 8 फेब्रुवारी या दोन दिवशी गौतम अदानी यांनी चक्क मुकेश अंबानी यांना मागेही टाकलं. पण, मुकेश यांनी दुसऱ्याच दिवशी आपली जागा परत मिळवली.
    मुकेश अंबानी मागची दहा वर्षं आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण, गौतम अदानींनी मागच्या दहा वर्षांत मोठी मजल मारून त्यांना आव्हान दिलं आहे.
    आज सोपी गोष्टमध्ये पाहूया गौतम अदानींनी मुकेश अंबानींना कसं मागे टाकलं?
    संशोधन - ऋजुता लुकतुके
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    8 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners