सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • पद्म पुरस्कारांची निवड कशी होते? आजवर कोणी पद्म पुरस्कार नाकारलाय? सोपी गोष्ट पॉडकास्ट 521

    पद्म पुरस्कार हे सरकारतर्फे दिले जाणारे नागरी सन्मान आहेत. विविध क्षेत्रांत असमान्य कार्य करणाऱ्या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात. पण या पद्म पुरस्कारांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? हे का दिले जातात? पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? आणि आजवर कोणी आणि का हे पुरस्कार नाकारले आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये

    संशोधन : अमृता दुर्वे

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    8 min
  • रशिया - युक्रेन तणाव : युरोप गारठण्याशी रशियाचा काय संबंध? | सोपी गोष्ट पॉडकास्ट 520

    भर थंडीच्या काळात त्यांच्याकडे ऊर्जा संकट निर्माण झालंय. प्रचंड मागणी असूनही युरोपियन देशांना कमी गॅस पुरवठा होतोय. पुरेसा नैसर्गिक वायू मिळाला नाही तर युरोपातल्या देशांमध्ये ऊर्जा निर्मिती कमी होईल आणि परिणामी लोकांना या थंडीच्या काळात विजेचा तुटवडा भासेल. पण नेमका आताच युरोपात हा ऊर्जा तुटवडा का निर्माण झालाय? आणि याचा रशिया आणि युक्रेनमधल्या तणावाशी काय संबंध आहे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन : टीम बीबीसी

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : गांधीजींचं आवडतं गाणं बीटिंग द रिट्रिट कार्यक्रमातून का वगळलं?

    महात्मा गांधींना आवडणाऱ्या इंग्रजी गीताची धून 1950पासून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातल्या ‘बीटिंग द रिट्रिट’ मध्ये सैन्यदलाचं संगीतपथक वाजवत असे. पण 72 वर्षांपासून वाजणारी ही धून या वर्षापासून वाजणार नाही. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहेत. या गाण्याची आणि वादाची ही सोपी गोष्ट. लेखन/निवेदन - मयुरेश कोण्णूर एडिटिंग - निलेश भोसले

    9 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: अमर जवान ज्योती राष्ट्रीय शहीद स्मारकात विलीन का करण्यात आली?

    आता नवीन तयार केलेल्या नॅशनल वॉर मेमोरियलच्या ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन करण्यात आली. पण असं का करण्यात आलं? हे करून काय साध्य होतंय? तब्बल 50 वर्षांपासून शहिदांना सलामी देत असलेल्या एका ज्योतीचं महत्त्व कमी केलं जातंय का? याची कारणं ऐतिहासिक आहेत की राजकीय?

    पाहूया अमर जवान ज्योतीची ही सोपी गोष्ट.

    लेखन–निवेदन – गुलशनकुमार वनकर

    एडिटिंग – निलेश भोसले

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: या ज्वालामुखीत विनाशकारी उद्रेक का झाला? | सोपी गोष्ट 517

    15 जानेवारी 2022 रोजी टोंगामधील बेटावर झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानंतर विस्फोटाच्या लहरी पॅसिफिक महासागरातच नाही, तर भारतात आणि थेट ब्रिटनमध्येही जाणवल्या. या ज्वालामुखीनं इतका विनाश का केला?

    संशोधन – टीम बीबीसी
    लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग – नीलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: या दोन बहि‍णींनी 9 मुलांची हत्या का केली? | सोपी गोष्ट 515

    अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी किरण शिंदेच्या साथीनं 13 लहान मुलांचे अपहरण आणि त्यातील 9 मुलांची निघृण हत्या केली होती. नव्वदच्या दशकात घडलेल्या या बालहत्याकांडाचा विषय निघाला की आजही अंगावर शहारे येतात.

    संशोधन – स्वाती पाटील
    लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग – शरद बढे

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : फटे स्कॅमसारख्या फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या?

    शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवत विशाल फटे नावाच्या व्यक्तीने बार्शी, सोलापूरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता गुंतवणूक कशी करायची? समजा आपल्याकडे भरपूर परतावा देणारी योजना असल्याचं कोणी सांगितलं, तर कोणकोणत्या गोष्टी तपासून पहायच्या? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन : अमृता दुर्वे

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : कोरोनाची साथ 2022 मध्ये संपणार का?

    कोरोनाचे रुग्ण कमी होतायत असं वाटेपर्यंत ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट आली. कोरोनाची साथ नेमकी कधी संपणार असा प्रश्न अनेकांना असतो. 2022 च्या वर्षात कोरोना पँडेमिककडून एंडेमिककडे जाईल का? हा आजार किती काळ गंभीर राहील? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये

    संशोधन - टीम बीबीसी

    लेखन, निवेदन- मयांक भागवत
    व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: श्रीलंकेत महागाई इतकी वाढलीय? एखादा देश दिवाळखोर कसा होतो?

    एखाद्या व्यक्तीनं बिलांची थकबाकी देणं बंद केलं तर काय होतं? तुम्हाला पैशाच्या मागणीसाठी त्रास देणारे फोन येतात, धमक्यांची पत्रं येतात आणि त्यानंतर तुमच्या इतर मालमत्तांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातो. मग एखादा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येतो तेव्हा काय होतं?

    श्रीलंकेत सध्या काय सुरू आहे? कर्ज, परकीय चलन आणि महागाई यांचा एकमेकांशी काय संबंध?
    समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन : रजनीश कुमार

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: ठाकरे सरकारने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय आता का घेतला?

    महाराष्ट्रातली सर्व दुकानं आणि आस्थापना म्हणजे commercial establishments च्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. आधीच्या नियमांतल्या पळवाटा बंद करणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचं उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.

    दुकानांच्या पाट्यांबद्दल आताच निर्णय घेण्यामागचं काय कारण आहे? दुकानांच्या पाट्या मराठीत करून नेमकं काय साध्य होईल?

    संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    9 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners