सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटवर बुस्टर डोस उत्तर आहे का?

    जगभरात सगळीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार होत असतानाच आता युकेमध्ये या व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मग सांगावं लागलं की, ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका. त्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. युकेमध्ये पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत सगळ्यांना बुस्टर डोस देणार अशी घोषणा करून टाकली. युकेच नाही तर जगभरात नवीन व्हेरियंट्सशी लढण्यासाठी बुस्टर डोसकडे आशेनं बघितलं जातंय. तसं जगभरातल्या संशोधकांना का वाटतंय. आणि भारताची बुस्टर डोसबद्दलची भूमिका नेमकी काय आहे पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - जेम्स गॅलागर, ऋजुता लुकतुके

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड -19 विरोधातल्या लशींचा दुसरा डोस घेणं महत्त्वाचं का आहे?

    महाराष्ट्रातल्या 83 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोव्हिड 19 विरोधातल्या लशीचा दुसरा डोस घेतलाच नसल्याचं समोर आलंय. कोरोना व्हायरसच्या विरोधात परिणामकारक ठरण्यासाठी लशीचे दोन्ही डोस घेणं महत्वाचं आणि गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे.

    मग असं असताना केवळ एक डोस घेऊन पुरेसं संरक्षण मिळेल का? दुसरा डोस घेतलाच नाही तर काय होईल?
    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

    संशोधन : टीम बीबीसी

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : रशिया आणि युक्रेनमध्ये काय बिनसलंय #सोपीगोष्ट 487

    रशियाने युक्रेनलगतच्या त्यांच्या सीमेजवळ सैन्य तैनात केल्याने सध्या या भागावर युद्धाचे ढग जम होताना दिसत आहेत. आपला असा कोणताही इरादा नसल्याचं रशियाने म्हटलं असलं तरी युक्रेनच्या नेत्यांनी मात्र 2022च्या सुरुवातीला हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे.

    रशिया आणि युक्रेनमध्ये नेमकं काय बिनसलं आहे? जगातल्या कोणत्या देशांचा युक्रेनला पाठिंबा आहे? आणि जगातले देश रशियावर कशी कारवाई करू शकतात? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    संशोधन : टीम बीबीसी

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    8 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : OBC आरक्षणाचा जन्म कसा झाला? #सोपीगोष्ट 486

    6 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले.त्यामुळे राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय.

    ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केल्यावर ज्या मंडल आयोगाचा संदर्भ येतो, तो काय होता? OBC आरक्षण द्यायला कधीपासून सुरुवात झाली?

    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    संशोधन : नामदेव काटकर

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: लष्करासाठीचा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी का होते आहे?

    नागालँडमध्ये लष्कराच्या हातून 14 नागरिकांचा मृत्यू झाला. देशातल्या अशांत क्षेत्रात काम करताना सशस्त्र दलांना विशेषाधिकार देणारा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी केली जाते आहे. नागालँड तसंच मेघालयच्या मुख्यमंत्र्‍यांनी ही मागणी केली आहे. हा कायदा काय आहे? तो लष्कराला कोणते अधिकार देतो? या कायद्याविरोधात कोणते आक्षेप आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून.

    संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- शरद बढे

    9 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय?

    अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा Freedom of Expression हे शब्द सहसा कोणत्यातरी वादाच्या संदर्भानेच येतात. त्यामुळेच बहुतेक वेळा त्यांचा विचारही एकाच बाजूने केला जातो. आपण या बाजूंमध्ये अडकून न पडता या प्रकरणाच्या मुळात शिरू या. त्याची व्याख्या, त्याच्यावरचे निर्बंध हे सगळं पाहू या.

    संशोधन – सिद्धनाथ गानू

    लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
    एडिटिंग – निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशिल्ड लशीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का तयार होत होत्या?

    सुरुवातीच्या काळात ऑक्सफर्डमध्ये संशोधन झालेल्या (भारतात आपण तिला कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो) कोरोना लशीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रमाण अत्यल्प असलं तरी लोकांमध्ये त्यामुळे लशीबद्दल संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर संशोधकांनी याचा अभ्यास करून गुठळ्या तयार होण्याचं कारण शोधून काढलं आहे. लशीच्या सुधारित आवृत्तीसाठी याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. हे संशोधन आणि त्याचं महत्त्व जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - जेम्स गॅलाघर
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- शरद बढे

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: सोयापेंड आयात वादात का सापडली?

    सोयापेंड आयातीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा लोकसभेतही मांडला होता. सोयापेंड आयातीवरून नेमका काय वाद निर्माण झालाय? या आयतीचे शेतकरी आणि बाजारपेठेवर काय परिणाम होऊ शकतात?

    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    संशोधन : अमृता दुर्वे, श्रीकांत बंगाळे

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: ओमिक्रॉन व्हेरियंटचा शोध कसा घेतला जातोय?

    दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आतापर्यंत जगभरातल्या 12 देशांमध्ये सापडलेला आहे. या व्हेरियंटमध्ये आधीच्या डेल्टा, डेल्टा प्लस वा इतर व्हेरियंटपेक्षा वेगळं काय आहे? आणि या व्हेरियंटचं निदान कसं केलं जातंय?

    समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

    संशोधन : टीम बीबीसी

    लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
    व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारत ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका कसा परतवणार? | सोपी गोष्ट 480

    ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरतील, हे अजून स्पष्ट नसलं, तरी लशीमुळे गंभीर आजाराचा धोका किमान काही प्रमाणात कमी होऊ शकतो, याविषयी जगभरातल्या तज्ज्ञांचं एकमत असल्याचं दिसतं. पण भारतात अजूनही कोव्हिड लसीकरणाचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत अजूनही कमीच आहे. अशा परिस्थितीत भारत ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का?

    संशोधन - जान्हवी मुळे, मयांक भागवत

    लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
    एडिटिंग – शरद बढे

    6 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners