सोपी गोष्ट

सोपी गोष्ट

By BBC Marathi AudioHealth & FitnessGovernment
Download on the App Store

सोपी गोष्ट episodes

  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: अतिभयंकर नैसर्गिक आपत्ती आता ‘न्यू नॉर्मल’ ठरणार

    तीव्र अशा उष्णतेच्या लाटा (हीटवेव्हज), विध्वंसकारी पूर आता आपल्यासाठी न्यू नॉर्मल ठरणार आहेत, आपल्या जगण्याचाच एक भाग होणार आहेत असं जागतिक हवामान संघटनेने म्हटलं आहे.

    2021 मधली हवामान बदलाची स्थिती यासंबंधी जो एक रिपोर्ट प्रकाशित झालाय त्यात एका शब्दाला अधोरेखित केलंय – ‘आपल्या डोळ्यादेखत बदलणारी परिस्थिती.’
    ’द स्टेट ऑफ क्लायमेट’ असं नाव असणारा हा रिपोर्ट भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची एक झलक दाखवतो. वाढतं तापमान, वाढती समुद्राची पातळी, अतिभयंकर नैसर्गिक आपत्ती असं सगळं त्यात आहे.
    COP26 परिषद लोकांसाठी आणि पृथ्वीसाठीही एक टर्निंग पॉईंट ठरायला हवी अशीच अपेक्षा अनेकांची आहे. पण आता त्यातून नेमकं काय साध्य होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पर्यावरणसंबंधी बातम्या, व्हीडिओ तसंच इतर विषयांसंबधी अपडेटेड बातम्या पाहाण्यासाठी बीबीसी मराठीच्या साईटला नक्की भेट द्या.

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: चीनचा नवा सीमा सुरक्षा कायदा काय आहे?

    मागचे सतरा महिने भारत आणि चीन दरम्यानच्या सीमेवर तणाव आहे. जून 2020मध्ये गलवान इथं दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेला रक्तरंजित संघर्ष कुणी विसरू शकणार नाही. त्यातच आता चीनच्या कम्युनिस्ट सरकारने देशात नवीन सीमा सुरक्षा कायदा आणलाय. चीनसाठी तो सीमेचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी केलेला कायदा आहे. पण, या कायद्यामुळे तिथलं सैन्य दळ आणि सीमेवरच्या राज्यांनाही वेळ प्रसंगी पोलिसी कारवाई करण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. हा चिनी कायदा नेमका काय आहे आणि त्यामुळे भारत-चीन सीमा वाद आणखी चिघळणार आहे का, हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

    संशोधन - बीबीसी मॉनिटरिंग

    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: आर्यन खानला जामीन मिळणं कठीण का झालं? ड्रग्जबद्दलचा NDPS कायदा काय आहे?

    आर्यन खान आणि इतर आरोपींवर NDPS कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा कायदा नेमका काय आहे? इतर कायद्यांच्या तुलनेत हा कायदा कठोर आणि वेगळा आहे का? आर्यन खानकडे ड्रग्ज मिळाली नाहीत, त्याने अंमली पदार्थांचं सेवनही केलेलं नव्हतं. मग त्याला जामीन मिळणं कठीण का झालं? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट.

    संशोधन : टीम बीबीसी

    लेखन,निवेदन : अमृता दुर्वे

    व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: 43 कोटींचं इनाम असलेल्या ड्रग माफियाला अशी झाली अटक

    73 हजार किलो कोकेनचं स्मगलिंग केलेल्या एका ड्रग माफियाची ही गोष्ट आहे. दाइरो आंतोनियो उसुगा उर्फ ओतोनिएल या ड्रग तस्कराला कोलंबियात अटक झाली. अमेरिकेत त्याच्यावर खटला भरला गेलाय. कोण आहे हा ओतोनिएल? ऐका सोपी गोष्ट.

    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
    एडिटिंग- निलेश भोसले

    5 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: पेट्रोल महागाईच्या फटक्यातून फ्लेक्स फ्युएल इंजिन सोडवतील का?

    ‘पुढची गाडी फ्लेक्स इंजिन असलेली घ्या, म्हणजे खर्चही कमी होईल आणि प्रदूषणही’ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल असं इंजिन लवकरच सगळ्या नव्या गाड्यांमध्ये बसवणं आपण बंधनकारक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. फ्लेक्स फ्युएल इंजिन काय असतात, ती कसं काम करतात आणि त्यांचे फायदे-तोटे काय हे सांगणारी ही सोपी गोष्ट.

    संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

    एडिटिंग- निलेश भोसले

    7 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: फेसबुकचं मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? सोपी गोष्ट 452

    मेटाव्हर्स या तंत्रज्ञानाविषयी सध्या सगळ्यांना कुतुहल आहे. फेसबुक कंपनीने तर हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पन्नास लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केलीय. इंटरनेटचा भविष्यकाळ म्हणून या तंत्रज्ञानाकडे पाहिलं जातंय. पण, मेटाव्हर्स म्हणजे नेमकं काय? आणि फेसबुकचा त्याच्याशी काय संबंध आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये...

    संशोधन - टीम बीबीसी
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: व्हॉट्सॲप चॅट पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य ठरतात का? सोपी गोष्ट 453

    आर्यन खान प्रकरण असेल किंवा रिया चक्रवर्तीची चौकशी किंवा अर्णब गोस्वामी – पार्थो दासगुप्ता यांचा कथित TRP घोटाळा, तपास यंत्रणा आपल्या आरोपांना आधार देण्यासाठी व्हॉट्सॲप चॅट्सचा हवाला देत असतात. पण कोर्टा व्हॉट्सॲप चॅट्सना पुरावा म्हणून मान्यता देतं?

    नेमकं काय आहे

    लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: महागाई अशीच कायम राहणार का? | सोपी गोष्ट 451

    भारतात सध्या सामान्य माणूस महागाईच्या ओझ्याखाली दबून जातो आहे. रोजच्या जेवणातल्या भाजीपाल्यापासून ते कपडे आणि कंप्युटर्सपर्यंत अनेक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामागची कारणं काय आहेत आणि महागाई कमी होण्याची काही शक्यता आहे का?

    लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
    एडिटिंग- निलेश भोसले

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट : काश्मिरमध्ये स्थलांतरित मजुरांवर हल्ले का होत आहेत?

    काश्मीरच्या कुलमागमध्ये रविवारी 17 ऑक्टोबरला दोन बिगर काश्मिरी नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या दीड महिन्यात याठिकाणी काश्मीरचे नसलेल्या पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. परप्रांतिय मजुरांनी जिवाच्या भीतीने काश्मीरखोऱ्यातून पलायन सुरू केलंय.

    जे मजूर थांबले आहेत, त्यांच्या मनात भीती आहे. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या काश्मिरी पंडित आणि शीख समुदायातल्या व्यक्तींच्या हत्यांमुळे काश्मिरमधला हा अल्पसंख्याक समाजही तणावाखाली आहे.

    काय सुरू आहे काश्मिर खोऱ्यात, कोण आहे या हत्यांमागे? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट.

    अधिक माहितीसाठी वाचा

    https://www.bbc.com/marathi/india-58948539

    6 min
  • सोपी गोष्ट पॉडकास्ट: बांगलादेश हिंदूंवर हल्ल्यांनंतर मोदी सरकारला शेख हसीना यांनी काय सांगितलं?

    नवरात्रात पूजा मंडपांमध्ये, हिंदू मंदिरांवर हल्ले झाले. काही ठिकाणी हिंदूंच्या घरांना आगी लावल्या गेल्या. पण बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणतात की भारताने खबरदारी घ्यावी की तिथे असा घटना घडणार नाहीत ज्यामुळे बांगलादेशच्या हिंदूंवर हल्ले होतील. पण शेख हसीना त्यांच्या देशातल्या हिंदूंच्या रक्षणासाठी भारताला इशारा का देतायत?

    7 min

About सोपी गोष्ट

From the publisher's feed

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

More shows like सोपी गोष्ट

Global News Podcast by BBC World Service

Global News Podcast

7,578 Listeners

Newshour by BBC World Service

Newshour

1,044 Listeners

In Our Time by BBC Radio 4

In Our Time

5,517 Listeners

The Documentary Podcast by BBC World Service

The Documentary Podcast

1,805 Listeners

6 Minute English by BBC Radio

6 Minute English

1,801 Listeners

Learning English Conversations by BBC Radio

Learning English Conversations

1,025 Listeners

Desert Island Discs by BBC Radio 4

Desert Island Discs

1,979 Listeners

You're Dead to Me by BBC Radio 4

You're Dead to Me

3,225 Listeners

Americast by BBC News

Americast

725 Listeners

The Bomb by BBC World Service

The Bomb

1,006 Listeners

Sakalchya Batmya / Daily Sakal News by Sakal Media News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

1 Listeners