
Sign up to save your podcasts
Or


कोरोनामुळे आतापर्यंत भारतात चार लाखांपेक्षा अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. पण प्रत्यक्षात हा आकडा त्याहूनही जास्त असेल असा अंदाज अभ्यासक वर्तवत आहेत. कोरोनाच्या काळात जून 21 पर्यंत भारतात 34 लाख ते 47 लाखांदरम्यान अतिरिक्त मृत्यू झाले असल्याचा संशोधकांचा दावा आहे. भारत सरकारने अतिरिक्त मृत्यूंची आणि त्यातून कोव्हिड मृतांची संख्या जाहीर करावी अशी मागणी केली जातेय. हे सगळं समजून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
उद्योगपती राज कुंदरा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न फिल्म्सशी संबंध असल्यावरून त्यांना अटक झालीय आणि अनेक वेगवेगळ्या कलमांअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेलेत. भारतात 2015 मध्ये 850 पेक्षा जास्त पॉर्न वेबसाईट्स बॅन केल्या गेल्या. चाईल्ड पॉर्नोग्राफी हा भारतात गुन्हा आहे. पण सर्व प्रकारचं पॉर्न पाहणं हा गुन्हा आहे का? कायदा नेमकं काय म्हणतो? या संवेदनशील विषयाची ही सोपी गोष्ट.
जगभरातल्या 15 माध्यमसंस्थांनी एकत्र येऊन केलेल्या एका तपासात असं दिसून आलंय की भारतातले 40 आणि जगातले 1400 लोक पेगॅसस नावाच्या एका स्पायवेअरच्या सहाय्याने पातळीखाली होते. हे स्पायवेअर NSO या इस्रायली कंपनीच्या मालकीचं आहे. पण या कंपनीने हे सगळे दावे फेटाळले आहेत. आपण हे तंत्रज्ञान फक्त सरकारांनाच विकतो असं या कंपनीचं म्हणणं आहे. मग याचा अर्थ खुद्द सरकारांनीच या लोकांवर पाळत ठेवली का? हे सगळं कसं काम करतं? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन- टीम बीबीसी
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षं झाली तरी देशाला देशद्रोहाच्या कायद्याची गरज आहे का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी केंद्रसरकारला विचरलाय. आणि बरोबरच या कायद्याचा राजकीय गैरवापर होत असल्याचं मतही व्यक्त केलं आहे. देशद्रोहाचा कायदा ब्रिटिशांनी 1870मध्ये आणला. आणि त्याचा वापर भारतीय स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्यासाठी केला. पण, स्वातंत्र्यानंतरही सत्ताधारी पक्षाकडून विरोधी मतांचा बिमोड करण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे आरोप अनेकदा होतात. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर भाष्य केलं आहे. त्या निमित्ताने बघूया देशद्रोहाचा कायदा आणि खरंच तो रद्दबातल करण्याची वेळ आली आहे का, आजच्या सोपी गोष्टमध्ये…
वाहनांच्या गर्दीमुळे होणारं हवेतलं प्रदूषण टाळायचं असेल तर एक उपाय म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स... इ-कार किंवा इ-बाईक हे वाहन क्षेत्रातलं आपलं भवितव्य आहे असं सगळेच मानतात. केंद्रसरकारनेही वेळोवेळी इ-वाहनांना प्रोत्साहन देण्याविषयी सुतोवाच केलंय. त्यालाच अनुसरून आता महाराष्ट्रात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी ई-पॉलिसी आणली आहे. 2025 पर्यंत नवीन वाहनांच्या खरेदीत 10% वाहनं ही इलेक्ट्रिक असावीत असं उद्दिष्ट या धोरणात आाहे. आपला देश आणि महाराष्ट्र इ-वाहनांच्या क्रांतीसाठी तयार आहे का? इ-वाहनांचं भवितव्य देशात काय आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये…
11 जुलै या जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यासाठी प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा जाहीर केला. दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना आरक्षण, सरकारी अनुदान मिळणार नाही, असं हा कायदा सांगतो. आसाम, कर्नाटक या इतर राज्यांतही तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1% च्या आत राखणं हे या कायद्यांचं उद्दिष्ट आहे. पण, हा कायदा म्हणजे 2022च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू-मुस्लीम कार्ड खेळण्याचा भाजपचा डाव आहे अशी टीका विरोधी पक्षांनी केलीय. तर सामाजिक अंगानेही या कायद्याचा विचार होणं गरजेचं आहे. म्हणूनच आज सोपी गोष्टमध्ये आधी बघूया हा कायदा आणि त्यावरच्या राजकीय, सामाजिक प्रतिक्रिया…
संशोधन - टीम बीबीसी
देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल पाठोपाठ डिझेलनेही दरांची शंभरी गाठली आहे. इंधनाच्या किमती आटोक्यात ठेवायच्या असतील तर केंद्राने उत्पादन शुल्क आणि राज्यसरकारने मूल्यवर्धित कर कमी करणं गरजेचं आहे. पण, त्यामुळे सरकारला मिळणारा महसूल बुडेल या भीतीने दोन्ही सरकारं हे कर कमी करत नाहीएत. सामान्यांवर मात्र त्यामुळे महागाईचा बोजा पडतोय. पेट्रोलचे दर सरकार का कमी करत नाही जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
अमेरिकेतली हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी वेबसाईट स्पेसवेदर डॉट कॉमवर सध्या एक इशारा झळकतोय. सूर्याच्या वातावरणात तयार झालेलं एक वादळ अती प्रचंड वेगाने अंतराळात फिरून आता पृथ्वीच्या दिशेनं सरकतंय. आणि ते पृथ्वीवरही धडकू शकतं. पण सोलार स्टॉर्म किंवा हे सौर वादळ नेमकं असतं काय? यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? यामुळे पृथ्वीवरचं तापमान अचानक वाढेल का? इंटरनेट, जीपीएस बंद पडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये…
तुम्ही महिला असाल. आणि एकेदिवशी अचानक तुम्हाला कळलं की, तुमचा फोटो आणि सोशल मीडियावरची तुमची इतर माहिती वापरून इंटरनेटवर तुम्हाला बदमान करण्यात येतंय तर? फक्त बदनामीच नाही तर तिथं तुमच्याबद्दल अश्लील बोललं जातंय आणि तुम्हाला चक्क विकायला काढलंय तर? संताप तर येईलच पण, त्याचबरोबर काही क्षण अगदी असहाय्य पण वाटेल. काही मुस्लीम महिलांच्या बाबतीत अलीकडे तसंच झालंय. सुल्ली डिल्स नावाचं एक ओपन सोर्स ॲप त्यासाठी तयार करण्यात आलं होतं. आणि बदनामी झालेल्यांच्यामध्ये काही प्रथितयश मुस्लीम महिला पत्रकारही आहेत. दिल्ली आणि मुंबई पोलीस सध्या हा गैरप्रकार करणाऱ्यांचा शोध घेतायत. यानंतर हे ॲप डिलिटही करण्यात आलंय. पण, त्यानिमित्ताने आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया महिलांची अशी बदनामी कशी थांबवता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं सोशल मीडिया प्रोफाईल कसं सुरक्षित ठेवायचं?
अफगाणिस्तानमध्ये सध्या नेमकं काय चाललंय?
लेखन - ऋजुता लुकतुके
From the publisher's feed
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

7,570 Listeners

1,045 Listeners

5,519 Listeners

1,807 Listeners

1,799 Listeners

1,025 Listeners

1,977 Listeners

3,223 Listeners

728 Listeners

1,006 Listeners

1 Listeners