Sports कट्टा

Sports कट्टा

By Ideabrew StudiosSportsNewsSports NewsCricket
Download on the App Store

Sports कट्टा episodes

  • How Ajinkya Rahane led Mumbai to a record 42nd Ranji Trophy title

    “Captain Ajinkya Rahane has held this Mumbai team together.” Rahane’s Mumbai teammates rightfully said this throughout the 2023-24 Ranji Trophy season. On 14 March 2024, Mumbai clinched the Ranji Trophy for the record-extending 42nd time. Rahane was available for Mumbai for the entire season, barring two games, which he had to sit out due to a niggle. He scored a vital half-century in the second innings of the Ranji final but was woefully out of form otherwise. However, for Rahane, the championship trophy matters the most and not the runs in front of his name. Throughout the campaign, his leadership won the hearts of fans and critics and resourcefully marshalled his troops to end Mumbai’s title drought. In this episode of Kattyawarchya Gappa with Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, Ajinkya talks about how domestic cricket has changed since his debut, Mumbai’s 2023-24 domestic season and how Mumbai won their 42nd Ranji Trophy title…

    कर्णधार अजिंक्य रहाणेने मुंबई संघाची मोट बांधून ठेवली आहे, असं त्याचे संघातले सहकारी संपूर्ण २०२३-२४ रणजी ट्रॉफी हंगाम म्हणत होते. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून मुंबईने १४ मार्च २०२४ ला विदर्भाला १६९ धावांनी हरवत ४२ व्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. दुखापतीमुळे दोन सामने वगळता रहाणे मुंबईसाठी पूर्ण हंगाम खेळला. ह्या हंगामात त्याची बॅट अंतिम सामन्यातला दुसरा डाव वगळता कधी तळपली नाही, पण रहाणेला त्याच्या धावांपेक्षा संघ जिंकल्याचा आनंद जास्त आहे. त्याच्या नेत्तृत्वाने मात्र त्याने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आणि २०१५-१६ नंतर पहिल्यांदाच मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली. ह्या विजेतेपदानंतर अजिंक्यने स्पोर्ट्स कट्ट्यावर द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर बरोबर गप्पा मारल्या त्या देशांतर्गत क्रिकेटवर, मुंबईच्या हंगामाबद्दल, अजिंक्यच्या पदार्पणापासून आत्तापर्यंत बदललेल्या क्रिकेटबद्दल आणि मुंबईने ४२वं रणजी ट्रॉफी विजेतेपद कसं जिंकलं ह्यावर...

    8 min
  • Why Dhawal Kulkarni has no regrets on retirement

    Umesh Ydav b Dhawal Kulkarni 6. 
    This was the final wicket of the 2023-24 Ranji Trophy season that earned Mumbai their 42nd Ranji Trophy title. The bowler who got that final wicket also called time on his 16 years of domestic career for Mumbai. Dhawal Kulkarni came into the Mumbai Ranji side from the U-19 set-up and shared the dressing room with the likes of Sachin Tendulkar, Wasim Jaffer, Zaheer Khan, Ajit Agarkar and Amol Muzumdar to name a few. What it means to play cricket for Mumbai and why that Mumbai dressing room is so special? As he prepares for his second innings, Dhawal Kulkarni takes a trip down memory lane with Amol Karhadkar, Sports Journalist, The Hindu, on Kattyawarchya Gappa… 

    धवल कुलकर्णीने उमेश यादवचा त्रिफळा उडवला आणि मुंबईने विदर्भाला हरवत ४२व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकत २०२३-२४ हंगामाचा शेवट गोड केला. त्या बळीबरोबरच धवलने त्याच्या १६ वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची देखील सांगता केली. ह्या क्षणाचं औचित्य साधून धवलने स्पोर्ट्स कट्टावर दिलखुलास गप्पा मारल्या... मुंबईसाठी खेळायला मिळणं हि प्रथमतः किती भाग्याची गोष्ट आहे, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, झहीर खान, वासिम जाफर, अमोल मुझुमदार  ह्यांच्यासमवेत रणजी ट्रॉफी जिंकण्याचा काय अनुभव असतो? मुंबईची ड्रेसिंग रुम इतर संघापेक्षा का वेगळी आहे आणि ह्या ड्रेसिंग रुमच्या त्याच्या काय आठवणी आणि शिकवणी आहेत. धवल कुलकर्णीने त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरसोबत कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...

    30 min
  • Pankaj Mohite's Rags-to-Riches story

    He grew up in a 10x10 room with his parents and elder sisters in Ganeshnagar, a slum in Mumbai's Wadala area. He lost his father when he was in school and his mother had to pick up an odd job to ensure the children continued with their education. He then started playing kabaddi on a stage with his friends in his locality. He rose through the ranks playing Junior and Senior Nationals. Then came a chance to play for Dena Bank and Air India before an opportunity in the Pro Kabaddi League came calling. He was a vital cog in Puneri Paltan's triumphant run in Season 10. In Kattyawarchya Gappa, Pankaj Mohite takes us into his world and shares his rags-to-riches story with Amol Gokhale

    पंकज मोहिते मुंबईतल्या वडाळा इथल्या गणेशनगर वस्तीत एका १०x१० च्या खोलीत आई, वडील आणि चार बहिणींसोबत हलाखीच्या परिस्थितीत वाढला. पंकज लहान असतानाच त्याचे वडील वारले आणि त्यानंतर आईने काम करून त्याला व त्याच्या बहिणींना वाढवलं. वस्तीतल्या एका स्टेजवर पंकजने सोबतच्या मुलांबरोबर कबड्डी खेळायला सुरुवात केली. तिथून त्याने रेडर म्हणून खेळत ज्युनिअर नॅशनल, नॅशनल, देना बँक, एअर इंडिया आणि प्रो कबड्डी लीग असा पल्ला गाठला. प्रो कबड्डीच्या दहाव्या हंगामात पुणेरी पलटणला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. पंकज मोहितेची हि स्लमडॉग मिलेनियर गोष्ट त्याने सांगितली आहे अमोल गोखलेला कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...

    1 hr 2 min
  • Club Cricket to Ranji Trophy via CSK: Story of Hitesh Walunj

    Hitesh Walunj picked up cricket in his school days and would train at Nehru Stadium in Pune. In academically crucial class X, he asked his parents to let him continue his cricket and as a trade-off, he carried his books around in the kit bag under the pretext of studying. But books never came out of the kit bag as Hitesh had set his mind on a cricket career. He progressed through club cricket and made his Maharashtra debut in the 2018-19 season in the Syed Mushtaq Ali Trophy. But he had to wait till the 2023-24 season to get his Ranji cap. He grabbed the opportunity to represent his state with both hands and picked up 41 wickets in seven games, bowling left-arm spin. He is also a net bowler for Chennai Super Kings. Hitesh shares his cricketing journey in this episode of Kattyawarchya Gappa with Amol Gokhale... 

    हितेश वाळुंजने शाळेत असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि सरावाला पुण्यातील नेहरू स्टेडियमवर जायचा. दहावीच्या महत्त्वाच्या वर्षात त्याने ठरवलं कि क्रिकेटमध्येच करियर करायचं. निमंत्रित क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत त्याने महाराष्ट्रासाठी खेळायच्या द्रुष्टीने वाटचाल चालू ठेवली. २०१८-१९ हंगामात हितेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी पदार्पण केलं पण रणजी ट्रॉफी पदार्पणासाठी मात्र २०२३-२४ हंगामाची वाट बघावी लागली. त्या संधीचं त्याने सोनं केलं आणि आपल्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने सात सामन्यात ४१ बळी घेतले. त्याचबरोबर तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी नेट बोलर देखील आहे. क्लब क्रिकेट ते महाराष्ट्र रणजी संघापर्यंतचा त्याचा प्रवास हितेश वाळुंजने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले बरोबर...

    30 min
  • Gully Cricket with Vinod Kambli to sports film music ft. Kaushal Inamdar

    Kaushal Inamdar is a renowned music composer as we know him. However, he is an ardent sports fan. He grew up in Dadar near Shivaji Park, so it was obvious that he picked up a bat and ball. But he also played hockey in his school days. Today, he passionately follows tennis as well. An athlete and music share a close bond as athletes often find themselves surrounded by music. In this episode of ‘Sportscha Kida’ with Amol Karhadkar, Kaushal shares the relationship between Sports and Music, the learnings from it as a music composer and a lot more…

    कौशल इनामदार हे ख्यातनाम संगीतकार आहेतच, परंतु खेळ हा त्यांचा तितकाच जिव्हाळ्याचा विषय आहे. दादरला शिवाजी पार्कजवळ वाढल्याने क्रिकेट अर्थातच त्यांच्या रक्तात आहे, पण शाळेत असताना क्रिकेटबरोबर ते हॉकीदेखील खेळले आहेत आणि आता टेनिसही तितक्याच आत्मीयतेने बघतात. खेळाडू आणि संगीत यांचं एक जवळचं नातं असतं, खेळातून त्यांना आयुष्यात आणि संगीतकाराच्या भूमिकेतून आलेली शिकवण म्हणून काय शिकता आलं, यावर कौशलने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत अमोल कऱ्हाडकरशी ‘स्पोर्ट्सचा किडा‘ या मालिकेत…

    28 min
  • How Ravi Shastri helped Mumbai regain Ranji Trophy, ft Sulakshan Kulkarni

    Mumbai won the Ranji Trophy in the 1984-85 season and had to endure a drought of eight seasons to lift the coveted trophy again. In his swansong 1993-94 season, Ravi Shastri guided Mumbai to the Ranji title. The quarter-final between Mumbai and Karnataka is still regarded as a landmark game in the history of Indian domestic cricket. Why is the very next season considered the finest domestic season of Sachin Tendulkar’s career? The same team lifted the Ranji Trophy again in 1996-97. What’s the secret of Mumbai’s success? In this episode of Kattyavarchya Gappa, Sulakshan Kulkarni, who was an integral part of those two title-winning runs, took a trip down memory lane with Amol Karhadkar on the latest offering of My Memorable Ranji Trophy Season.

    १९८४-८५ ते १९९३-९४ हे आठ हंगाम नऊ वर्ष हा मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या इतिहासातला सर्वात दुष्काळ होता. ९३-९४ हंगामात मुंबईने रवी शास्त्रीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना रणजी ट्रॉफीमध्ये ते 'दादा' संघ का आहेत हे दाखवून दिलं. कर्नाटकविरुद्धचा उपांत्यपूर्व  फेरीचा सामना भारतीय क्रिकेटच्या द्रुष्टीने महत्त्वाचा का मानला जातो? मुंबईच्या यशाचं गमक काय असतं? ९४-९५ हंगामातला सचिन तेंडुलकरचा झंझावात काय होता? तसंच ह्या ९३-९४च्या फळीने ९६-९७ मध्ये पुन्हा कशी विजेतेपदाला गवसणी घातली? रवी शास्त्री, संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर हे कर्णधार म्हणून कसे होते? हे सगळं जवळून अनुभवलेले सुलक्षण कुलकर्णी सांगत आहेत त्यांच्या संस्मरणीय रणजी हंगामाच्या आठवणी कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल कऱ्हाडकरला…

    39 min
  • Why Sarfaraz Khan needs to be celebrated

    Finally, Sarfaraz Khan made his India debut and how. He scored scintillating half-centuries in both the innings against England in the third Test. But this opportunity came Sarfaraz’s way after banging scoring runs and tons in all conditions and situations. This was a reward for his hard work. Amol Karhadkar, Deputy Sports Editor, at The Hindu, shares his story. But does every cricketer get his reward with an India cap? The answer is ‘No’. In this episode of Weekly katta, Amol Gokhale and Aditya Joshi take a look at a few of India’s domestic stalwarts who never got the India cap… 

    सर्फराझ खानला अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवल्यावर, निवडसमितीच्या दारावर अविरतपणे ठोठावल्यावर अखेरीस तिसऱ्या भारत वि. इंग्लंड कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली.त्याने त्या संधीच अक्षरशः सोनं केलं. पण प्रत्येक खेळाडूस अशी संधी मिळते का? तर त्याचं उत्तर 'नाही' असं येतं. ह्या वीकली कट्टयावर आदित्य जोशी आणि अमोल गोखले काही अश्या खेळाडूंचा आढावा घेत आहेत ज्यांच्यासाठी भारतीय संघाची दारं किलकिली झाली किंवा कधी उघडलीच नाहीत...  त्याचबरोबर अमोल कऱ्हाडकर सांगतोय सर्फराझ खानचा देशांतर्गत क्रिकेटमधला प्रवास...

    32 min
  • Ashwin, Stokes to create history, will Rajkot pitch be a mystery?

    In a first in the Marathi podcast world, Sports Katta and  @LeleSunandan  present the first 'crossover podcast' while previewing the third Test between India and England, to be played at the Niranjan Shah Cricket Stadium in Rajkot. The episode features Sunandan Lele and Amol Karhadkar, Deputy Editor with The Hindu...

    मराठी पॉडकास्टमध्ये प्रथमच एक क्रॉसओव्हर घडतंय... स्पोर्ट्स कट्टा आणि सुनंदन लेले घेऊन येत आहेत भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीचं सादर करीत आहेत पूर्वावलोकन म्हणजे प्रिव्हू...  राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या ह्या कसोटीत रविचंद्रन अश्विन, बेन स्टोक्स, जेम्स अँडरसन ह्या सारख्या विक्रमांच्या उंबरठ्यावर असलेल्या खेळाडूंची हातोटी लागेल का ते कसोटी क्रिकेटचे दादा खेळाडू आहेत हे पुन्हा सिद्ध होईल. द हिंदूचा डेप्युटी एडिटर अमोल कऱ्हाडकर आणि सुनंदन घेऊन येत आहेत हा विशेष भाग राजकोटमधून...

    17 min
  • Why IPL stars are reluctant to play Test Cricket?

    India and England are set to resume their five-match Test series after a break of 10 days and one can sense that something is bubbling under the surface. The big question is, are IPL stars reluctant to play Test cricket? Or is it just a matter of prioritizing white-ball cricket? The debate can and will go on. 
    On the other hand, records beckon in the third Test. Sarfraz Khan can make his Test debut. Ben Stokes is set to play his 100th Test match. Ravichandran Ashwin is on the brink of 500 Test wickets and James Anderson is five shy of 700 at the age of 41. Sports Katta’s troika - Aditya Joshi, Amol Gokhale and The Hindu’s Sports Journalist Amol Karhadkar - analyze the recent events in the red-ball arena in this episode of Weekly Katta.

    भारत आणि इंग्लंड ह्यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. पण मधल्या १० दिवसात भारतीय संघात मधल्या फळीतील फलंदाजांची कमतरता बघता सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच उद्भवला असणार. IPL मधल्या 'मोठ्या' खेळाडूंना कसोटी क्रिकेट आणि पर्यायाने रणजी क्रिकेट खेळणं नकोसं झालंय का? का त्यांच्या करियरच्या द्रुष्टीने त्यांना काय करायचं आहे ह्याची स्पष्टता त्यांना आहे असं म्हणणं संयुक्तिक ठरेल? ही चर्चा येणाऱ्या काळात सुरूच राहील. पण केवळ तिसऱ्या कसोटीचा विचार केला तर काही नामवंत खेळाडू विविध विक्रमांच्या उंबरठ्यावर आहेत. सर्फराझ खानला अखेर पदार्पणाची संधी मिळू शकते, तर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स शंभरावी कसोटी खेळणार आहे. रविचंद्रन अश्विन ५०० तर जेम्स अँडरसन ७०० कसोटी बळींच्या उंबरठ्यावर आहेत. वीकली कट्टयावर ह्या आणि अश्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे अमोल गोखले, आदित्य जोशी आणि द हिंदूंचा क्रीडा पत्रकार अमोल कर्हाडकरने...

    28 min
  • Another final, another loss for Team India: Takeaways of U-19 World Cup

    The U-19 Cricket World Cup once again highlighted a couple of things. India’s consistent performance to make it to the final for the fifth consecutive time. However, their unbeaten run came to a grinding halt against a familiar foe in the final - Australia. But what are the takeaways of this tournament? Uday Saharan came out with flying colours as a skipper and a batter. Musheer Khan and Sachin Dhas showed why they are so highly regarded. On the flip side, Arshin Kulkarni, who promised so much in the lead-up, had an underwhelming tournament. Precisely the pitfalls one must look out for. It is a collective responsibility of the Indian Cricketing ecosystem that these young boys are groomed well so that they can represent the country at the highest level. Amol Gokhale analyzes the U-19 World Cup from India’s perspective in this episode of Weekly Katta. 

    १९-वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकाने काही गोष्टी पुन्हा अधोरेखित केल्या. एक म्हणजे भारताचं स्पर्धेतील सातत्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वचषक आणि ऑस्ट्रेलिया ह्यांचं समीकरण. अंतिम सामन्यापर्यंत अपराजित असलेला भारतीय संघ पुन्हा एकदा शेवटच्या पायरीवर ऑस्ट्रेलियासमोर अडखळला. उदय सहरण, मुशीर खान, सचिन धस, सौमी कुमार पांडे, नमन तिवारी अशी नावं ह्या वर्ल्ड कपने भारतीय क्रिकेट चाहत्यांना ओळखीची झाली. असं जरी असलं तरी वास्तवाचं भान राखणं गरजेचं आहे. ह्या कामगिरीने हुरळून न जाता पाय जमिनीवर ठेवून सर्वांनीच - खेळाडू, राज्य संघटना आणि ईतर घटक - ह्या खेळाडूंचा खेळ अजून कसा बहरेल, ह्यातून भावी भारतीय खेळाडू कसे तयार होतील याकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्या १९-वर्षाखालील विश्वचषकाचा लेखा-जोखा घेतला आहे अमोल गोखलेने ह्या वीकली कट्ट्यावर…

    15 min

About Sports कट्टा

From the publisher's feed

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi…

More shows like Sports कट्टा

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners