
Sign up to save your podcasts
Or


Shrikant Jadhav grew up in a small village in Ahmednagar district. A certificate of appreciation at the hands of a chief guest in school on Independence Day was a big deal for him at that time. As his game flourished, he moved to Mumbai to compete in Professional tournaments. The journey hasn't been easy by any stretch of the imagination. Shrikant had to pull out of the first two seasons of the Pro Kabaddi League (PKL) because of injuries. That's when the reality hit him hard. He decided to quit the sport so that he could run the house. As fate would have it, Shrikant found his way back into Kabaddi. Today he's one of the most consistent raiders in the league. Shrikant Jadhav shares his journey on this episode of Kattyavarchya Gappa with Amol Gokhale…
श्रीकांत जाधवने कबड्डी खेळायला सुरुवात केली अहमदनगर जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातून. स्वांत्र्यदिनाच्या दिवशी प्रमुख पाहुण्यांकडून मिळणारं प्रशस्तिपत्रक हि तेव्हा त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तिथून पुढे त्याचा खेळ जसा बहरला तसं त्याने घर सोडलं, मुंबईत आला आणि व्यावसायिक कबड्डी खेळायला सुरुवात केली. आज श्रीकांत प्रो कबड्डी लीगमध्ये आठवा हंगाम खेळतोय, पण हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. प्रो कबड्डीच्या पहिल्या दोन हंगामांवर पाणी सोडावं लागलं कारण स्पर्धा तोंडावर असताना दुखापत झाली. त्यावेळी घरच्या हलाखीच्या परिस्थितीच्या वास्तव्याला सामोरं जाण्यासाठी श्रीकांतने कबड्डी सोडायचा टोकाचा निर्णय घेतला, पोलीस भरतीची परीक्षा देखील दिली. पण त्याच्या नशिबात कबड्डी लिहिली होती आणि तो खेळात परत आला. त्याचा हा प्रवास श्रीकांतने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले बरोबर...
India’s premier off-spinner Ravichandran Ashwin is on the cusp of 500 Test wickets with 499 against his name after the second India vs England Test. To mark his imminent landmark achievement, in this episode of Weekly Katta, Aditya Joshi and Amol Karhadkar look at his career, the hurdles he had to cross and where his achievement stands in terms of the rich lineage of Indian spinners. Is he the greatest Indian spinner ever?
भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ५०० कसोटी बळींच्या उंबरठ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीनंतर त्याचे ४९९ बळी आहेत. त्याच्या ह्या कामगिरी निमित्त आदित्य जोशी आणि अमोल कऱ्हाडकर वीकली कट्ट्यावर आढावा घेत आहेत अश्विनच्या कसोटी कारकिर्दीचा. भारताला लाभलेल्या अनेक उत्तमोत्तम फिरकी गोलंदाजांच्या यादीत अश्विन कुठल्या क्रमांकावर आहे? का तो भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू आहे?
Aditya Ganpule won a gold medal in the 100mtrs sprint in his school days. But he opted to play kho-kho because his brother played the game. Today, he plays for Telugu Yoddhas in the Ultimate Kho-Kho league but the journey wasn’t an easy one. He had to deal with failure multiple times at a young age but he kept going without giving up. Still 21, Aditya shares his journey to the top in this episode of Kattyavarchya Gappa with Amol Gokhale…
आदित्य गणपुले शाळेत असताना १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिला आला होता. पण तो खो-खो कडे वळला कारण त्याचा मोठा भाऊ अक्षय खो-खो खेळायचा. पण त्याचा खो-खो चा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये अनेक त्याला संधी मिळाली नाही पण जिद्द न हरता तो प्रयत्न करत राहिला. दिवसातून एक ऐवजी दोन वेळा सराव करून त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि आणि आज तो २१व्या वर्षी अल्टिमेट खो-खो मध्ये तेलगू योद्धाज् संघाकडून खेळतो. त्याचा हा प्रवास आदित्य गणपुलेने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले बरोबर...
Rohan Bopanna recently became the oldest tennis player to achieve the World No. 1 ranking in men’s doubles. He also clinched his first men’s doubles title at the Australian Open to add the cherry to the top. Bopanna’s achievements become even more special when you realise that he is 43 years old or in his own words, he is on Level 43. Amol Gokhale, Gaurav Rao and Ninad Indapurkar put into perspective what Bopanna’s feat means to Indian tennis in this episode of Weekly Katta…
भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल ठरणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला. त्यावर कडी करत त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद देखील पटकावलं. ह्या गोष्टी जास्त विशेष ठरतात कारण रोहनने ह्या दोन्ही गोष्टी वयाच्या ४३व्या वर्षी करुन दाखवल्या आहेत. बोपण्णाच्या शब्दात तो आत्ता लेव्हल ४३ वर आहे. रोहन बोपण्णाच्या ह्या ऐतिहासिक कामगिरीच्या अनुषंगाने अमोल गोखलेने भारतीय टेनिस जगतावर गप्पा मारल्या आहेत डेटा ॲनालिस्ट व टेनिसपटू गौरव राव आणि क्रीडा चाहता निनाद इंदापूरकर ह्यांच्यासोबत वीकली कट्टयावर...
India’s kabaddi star Aslam Inamdar has a touching story. He hails from a poor background and lost his father at a young age. His mother had to work as a domestic help to run the house. The situation compelled Aslam to pick up odd jobs at hotels and farmlands to help his family. However, he never gave his Kabaddi practice a miss. His life changed for the better after he moved to Thane-Mumbai to play in professional kabaddi leagues. His stock rose rapidly after a phenomenal show in the Junior National Meet and every Pro Kabaddi League (PKL) team wanted to sign him. However, he sat out the entire season of PKL because his ‘Guru’ asked him to. But when he returned to the mat with Puneri Paltan, he won everyone’s hearts. Today, Aslam is an Asian Games gold medal winner with the country and shares his journey in this episode of Kattyavarchya Gappa with Amol Gokhale…
अस्लम इनामदार हलाखीच्या परिस्थितीत वाढला. वडील तो लहान असताना वारले, आई चार घरची धुणी-भांडी करून घर चालवायची. त्यामुळे घरी पैसे मागायला लागू नयेत म्हणून त्यानेदेखील लोकांच्या शेतात, हॉटेलमध्ये, पडेल ते काम करत कबड्डी जोपासली. ठाणे-मुंबईत व्यावसायिक कबड्डी खेळायला सुरुवात केल्यावर अस्लमच्या आयुष्याला कलाटणी मिळायला सुरुवात झाली. स्वावलंबन, अपार कष्ट करायची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर त्याने व्यासायिक कबड्डीत नाव तर कमावलंच, पण 'ज्युनियर नॅशनलमध्ये' चमकदार कामगिरी करत संबंध भारतीय कबड्डी विश्वाचं लक्ष स्वतः कडे वळवलं. केवळ गुरुच्या एका शब्दावर अस्लम 'प्रो कबड्डी लीगचा' एक हंगाम बाहेर पण बसला आणि जेव्हा पुणेरी पलटणकडून मैदानात उतरला तेव्हा मैदान मारलं. आज तो आशियाई खेळात भारताकडून सुवर्णपदक विजेता खेळाडू आहे. त्याचा हा कबड्डीचा प्रवास अस्लम इनामदारने उलगडा आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले सोबत...
Pacer Prem Devkar began his cricketing journey at 13, playing tennis ball cricket in the backyard with his brothers. Even though he tasted success in that format he always aspired to play ‘leather ball’ cricket. But, in Dombivali, he did not get as many opportunities as he would’ve liked. However, his life shifted into a fast lane on December 13, 2022, when he met coach Sanjay Gaitonde. In the past year, he has made the most of the opportunities that came his way. His impressive bowling performances saw him represent Mumbai at the Vinoo Mankad Trophy, and India U-19s for a quadrangular involving England U-19 and Bangladesh U-19 and made it into India’s U-19 World Cup squad as a reserved bowler. Aditya Joshi charts Prem Devkar’s astonishing journey on Kattyavarchya Gappa…
प्रेम देवकर डोंबिवलीजवळच्या देसाई गावचा, जिथे त्याने १३व्या वर्षी टेनिस चेंडूवर घरामागच्या मैदानावर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज असलेल्या प्रेमला डोंबिवलीत टेनिस चेंडूवर चिक्कार यश मिळालं, पण लेदरच्या चेंडूवर क्रिकेट खेळायची संधी काही मिळाली नाही. १३ डिसेंबर २०२२ ला प्रेमचं आयुष्य बदललं, जेव्हा त्याने प्रशिक्षक संजय गायतोंडेंची भेट घेतली. त्यानंतरच्या एका वर्षात त्याच्या प्रगतीचा वेग थक्क करणारा आहे. गाव ते बांद्रा असा किमान दोन तासाचा एकवेळ प्रवास करत त्याने मिळालेल्या संधीचं सोनं करत विनू मंकड ट्रॉफी, चॅलेंजर, आणि इंडिया U-१९ सगळीकडे आपली छाप पाडली. तो आत्ता दक्षिण आफ्रिकेत १९-वर्षाखालील विश्वचषक खेळायला गेलेल्या संघात राखीव खेळाडू आहे. त्याच्या ह्या प्रवासात त्याच्या कुटुंबाचा आणि आग्री समाजाचा खूप मोठा वाटा आहे. प्रेम देवकरचा हा प्रवास उलगडला आहे आदित्य जोशीने कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...
The U-19 Cricket World Cup kicks off on January 19 in South Africa. The stalwarts of Indian cricket - Yuvraj Singh, Mohammed Kaif, Rohit Sharma, Virat Kohli - to name a few, all played in the U-19 World Cup. That put them in the limelight but they had to go through the grind of domestic cricket to earn the India cap. Arshin Kulkarni, Sachin Dhas and Musheer Khan are three Maharashtrians in this year’s U-19 squad and are ones to watch out for. But, is this tournament still relevant? How many of these ‘U-19 stars’ achieve their full potential? In this episode of Weekly Katta, Aditya Joshi and Amol Karhadkar take a deep dive into the subject…
१९-वर्षाखालील मुलांचा विश्वचषक १९ जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू होत आहे. युवराज सिंह, मोहम्मद कैफ, रोहित शर्मा, आणि विराट कोहलीसारखे अनेक खेळाडू या स्पर्धेमुळेच प्रसिद्धीच्या झोतात आले पण देशांतर्गत क्रिकेटमधल्या कामगिरीनेच भारतीय संघाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले. आज ह्या स्पर्धेला असलेलं महत्त्व २००० च्या दशकाच्या तुलनेत कमी झालं आहे. तसंच १९ वर्षाखालील विश्वचषक खेळले म्हणून खेळाडूंना भारतीय संघात किंवा IPL मध्ये संधी मिळतेच आहे असं नाही. त्या खेळाडूंना त्यांचं कर्तॄत्व देशांतर्गत स्पर्धेत सिद्ध करावं लागतंय. यंदाच्या स्पर्धेत अर्शिन कुलकर्णी, सचिन धस, मुशीर खान अशी मराठी-भाषिक मुलं आहेत. आदित्य जोशी आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर ही स्पर्धा, त्याचं महत्त्व आणि यावेळी भारताला असलेली संधी यावर चर्चा करत आहेत वीकली कट्ट्यावर...
Indian women’s cricket team recently played two marquee home series against England and Australia. Indian team triumphed in the red-ball format but were outclassed in the limited-overs cricket. How does one look at the team’s performance with the T20 World Cup in Bangladesh later this year in mind? Does out-of-form skipper Harmanpreet Kaur need a break? Juili Ballal and former India international Soniya Dabir analyse on Weekly Katta…
भारतीय महिला संघ नुकताच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर मोठ्या मालिका खेळला. कसोटीमध्ये भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला धूळ चारली पण एकदिवसीय आणि T२० मालिकेत मात्र पराभव स्वीकारावा लागला. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये होणाऱ्या T२० विश्वचषकाच्या अनुषंगाने ह्या मालिकांकडे कसं बघावं? सूर हरपलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांतीची गरज आहे? जुईली बल्लाळ ह्या सगळ्याचं विश्लेषण करते आहे माजी भारतीय खेळाडू सोनिया डबीर सोबत वीकली कट्टावर...
Pratik Waikar was good at ‘Langdi’ in his school days. Thus, he would frequent the ‘Kho-Kho’ ground for Langdi practice. That’s how his Kho-Kho journey started and he excelled at it. So much so that Pratik has captained Maharashtra in all-group categories and today leads the Telugu Yoddhas side in ‘Ultimate Kho-Kho’ league. In this episode of Kattyavarchya Gappa with Amol Gokhale, Pratik shares the journey that started in Pune and earned him ‘The Shiv Chhatrapati Award’, the highest sports award of the Maharashtra government…
शाळेत लंगडी चांगला खेळतो म्हणून सरावाला खो-खोच्या मैदानावर जाण्यापासून प्रतिक वाईकरची खो-खो खेळायला सुरुवात झाली. त्याचं खेळातील नैपुण्य इतकं होतं कि त्याने महाराष्ट्रासाठी सर्व वयोगटात कर्णधार म्हणून कामगिरी बजावलीच पण आत्ता अल्टिमेट खो-खो स्पर्धेतदेखील तेलगू योद्धाज् संघाचा तो कर्णधार आहे. पुण्यातील मैदानावर सुरु झालेला त्याचा प्रवास ते शिव छत्रपती पुरस्कार मिळणं, इथपर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागलेली मेहनत आणि क्रिकेट एवढी प्रसिद्धी नसलेला खेळ खेळताना खेळाडूला कोणत्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं? प्रतिक वाईकरने त्याचा प्रवास उलगडला आहे अमोल गोखले बरोबर कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...
Rohit Sharma and Virat Kohli returned to the Indian T20 side for the first time since November 2022, for a three-match series against Afghanistan. The former will lead the team in the absence of injured Hardik Pandya and Suryakumar Yadav. Does this move mean the duo is back in the scheme of things for the T20 World Cup in June? Is this a step in the right direction? On the other hand, Cheteshwar Pujara did what he does best in the opening round of Ranji Trophy. Score a daddy hundred. How crucial is that knock with selection for the England Test imminent. Amol Gokhale and Aditya Joshi analyse these two events on Weekly Katta…
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने नोव्हेंबर २०२२ नंतर पहिल्यांदा भारतीय T२० संघात पुनरागमन केलं. हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत रोहित संघाचं नेतृत्व करेल. ह्याचा अर्थ संघव्यवस्थापन त्यांचा T२० विश्वचषकासाठी पण विचार करतंय का? भारतीय संघासाठी हे योग्य दिशेने पाऊल आहे? रणजी ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यात चेतेश्वर पुजाराने द्विशतक झळकावून निवड समितीला द्विधा मनस्थितीत टाकलंय? अमोल गोखले आणि आदित्य जोशी ह्या दोन घडामोडींचा आढावा घेत आहेत वीकली कट्ट्यावर...
From the publisher's feed

4 Listeners

2 Listeners

2 Listeners

1 Listeners

0 Listeners

2 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

0 Listeners

3 Listeners

0 Listeners