Sports कट्टा

Sports कट्टा

By Ideabrew StudiosSportsNewsSports NewsCricket
Download on the App Store

Sports कट्टा episodes

  • IPL retention special - Rishabh Pant, Shreyas Iyer, Arshdeep Singh in IPL Auction?

    With the October 31 deadline for IPL Player Retention fast approaching, it’s time to take stock of whether Mumbai Indians can retain all its stars and the big names that could be released. Amol Karhadkar, The Hindu’s sports journalist, joins Team Sports Katta’s Aditya Joshi and reveals a new rule that could be the game-changer. Watch our retention picks in Weekly Katta and list your preferred retention for your favourite, if not all, IPL teams 

    आयपीएल प्लेअर रिटेन्शनसाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत जवळ येत असताना, मुंबई इंडियन्स आपले सर्व स्टार्स स्वतःकडे ठेवू शकतात की नाही आणि कोणते मोठे खेळाडू लिलावात जाणं पसंत करतात, याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. अमोल कऱ्हाडकर, 'द हिंदू'चे क्रीडा पत्रकार, 'स्पोर्ट्स कट्टा'च्या दित्य जोशीशी चर्चा करताना एका नव्या नियमाबद्दल सांगत आहेत, ज्याने सगळा खेळच पालटू शकतो. 'वीकली कट्टा' मध्ये आमची निवड पहा आणि तुमच्या रिटेंशनची यादी कमेंट बॉक्समध्ये लिहा


    36 min
  • Meet Tanush Kotian, the Khadoos Mumbai allrounder

    Son of a tennis-ball cricket stalwart, he switch to a school in Dadar and started commuting from Vikhroli to further his and his family's cricket ambitions. Since then, from a promising allrounder, he has evolved into a quintessential Khadoos Mumbai cricketer. Player of the Tournament in Mumbai's Ranji Trophy triumphant season, he has also been the player of the match in the Vijay Hazare Trophy final. Having represented Rajasthan Royals in IPL 2024, Tanush Kotian is set to travel to Australia along with INdia A squad. Let's get up, close and personal with Kotian in Kattyawarchya Gappa

    वडिल टेनिस-बॉल क्रिकेटमधील दादा! त्यामुळेच विक्रोळीचा मुलगा क्रिकेटसाठी दादरच्या शाळेत आला आणि त्याने स्वत:च आणि घरच्यांचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न मेहनतीने साकार केलं. मुंबईच्या रणजी विजेतेपदामध्ये तो मालिकावीर होता, इराणी कपच्या अंतिम सामन्यात शतकवीर होता आणि गेले चार हंगाम त्याने अनेक महत्त्वाच्या धावा आणि विकेट्स काढल्या आहेत. भारतीय संघासाठी नाही तर ‘अ’ संघासाठी निश्चित दावेदारी सांगितली आहे. पुढील काही वर्षे देशांतर्गत क्रिकेट असो, वा IPL - कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटसुद्धा - तनुष कोटियनचे नाव दुमदुमत राहणार आहे. भेटूया तनुषला कट्ट्यावरच्या गप्पांम

    35 min
  • Harshit Rana's gain, Harmanpreet Kaur's loss & Mumbai's shock defeat

    T२० वर्ल्ड कपमधून महिलांची पहिल्याच फेरीत घरवापसी. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईवर पराभवाची नामुष्की. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत सर्फराझला मिळणार का संधी? आणि हर्षित राणाला T२० मालिकेत आलेल्या तापामुळे KKR ची होणार का IPL रिटेंशनच्या वेळेस चांदी? पाहूया आदित्य जोशी व 'द हिंदू' चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांचा 'वीकली कट्टा'

    India's early exit from the Women's T20 World Cup. Mumbai's shocking defeat against Baroda in the Ranji Trophy season-opener. The likelihood of Sarfaraz Khan getting game-time during India's Test series against New Zealand. And whether Harshit Rana's viral infection should be connected with IPL Retentions? Let's discuss these issues in Weekly Katta, featuring Sports Katta's Aditya Joshi and The Hindu's sports journalist Amol Karhadkar

    30 min
  • From Banjara Express to Bengal Warriors - meet Akash Chavhan, the Pro Kabaddi star

    He hails from Devthana, a remote village in Washim district. Having earned a reputation as Banjara Express, thanks to his exploits in and around his district, Akash Chavhan has been signed by Bengal Warriors for Pro Kabaddi League's 2024-25 season. Let's track Akash's memorable journey and his desire to succeed despite various hurdles en route

    तो मूळचा वाशिम जिल्ह्यातील देवठाणा या दुर्गम गावचा आहे. पंचक्रोशीतील कबड्डी मैदाने गाजवून आकाश चव्हाणने 'बंजारा एक्स्प्रेस' असा नावलौकिक मिळविला. प्रो कबड्डी लीगच्या 2024-25 हंगामासाठी बंगाल वॉरियर्सने आकाशला करारबद्ध केले आहे. पाहूया आकाशचा अविस्मरणीय प्रवास आणि विविध अडथळ्यांवर मात करत यशस्वी होण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती 


    37 min
  • The pros and cons of IPL retention rules

    Who gains from the retention rules ahead of the Indian Premier League's mega auction? How can Mahendra Singh Dhoni be treated as an uncapped cricketer? Why is the IPL harsh on overseas cricketers? And is it fair to introduce match fees in IPL? Let's discuss all of it with Sports Katta's Aditya Joshi and Amol Karhadkar, The Hindu's Deputy Editor.
    इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा-लिलावापूर्वी जाहिर झालेल्या रिटेन्शन नियमांचा सर्वात जास्त फायदा कठल्या संघाला होणार? महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड क्रिकेटर म्हणून कसे समजले जाऊ शकते? परदेशी क्रिकेटपटूंवर IPL इतकी कठोर का आहे? आणि IPL मध्ये मॅच फी लागू करणे योग्य आहे का? जाणून घेऊया 'स्पोर्ट्स कट्टा' चे आदित्य जोशी आणि 'द हिंदू' चे क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्याकडून
    ETA: 7pm

    29 min
  • Meet Milind Gunjal, a leading light of Maharashtra cricket

    They said Maharashtra cricketers cannot succeed while putting in the hard yards on Mumbai maidans. He did. They said Maharashtra batters couldn't score away from Nehru Stadium. He did. They said Maharashtra as a team can rarely deliver consistently. He was instrumental in shaping the golden generation of Maharashtra's Ranji Trophy team that fared consistently for a decade starting the mid-80s. Milind Gunjal proved virtually everyone wrong with his stellar batting at all the levels he got an opportunity at. Still, the only thing he couldn't change was to earn the India cap and end up as one of the top names on the long list of "Maharashtra's unfortunate cricketers to have not represented India" in international cricket. Let's walk down the memory lane with Milind Gunjal himself.

    मुंबईच्या मैदानावर महाराष्ट्राचे क्रिकेटपटू यशस्वी होऊ शकत नाहीत, असं म्हणायचे. ते झाले. असंही म्हणायचे - खरं तर हिणवायचे - कि नेहरू स्टेडियमपासून दूर महाराष्ट्राचे फलंदाज धावा करू शकत नाहीत. त्यांनी कुटल्या. अशीही वदंता असायची कि एक संघ म्हणून महाराष्ट्र क्वचितच सातत्यपूर्ण कामगिरी करायचा. त्यांनी महाराष्ट्र रणजी संघाची 'गोल्डन जनरेशन' घडवण्यात मोलाची भूमिका बजावली. मिलिंद गुंजाळ यांनी सर्व स्तरांवर आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने अक्षरशः प्रत्येकाला चुकीचे सिद्ध केले. तरीही, ते फक्त एक गोष्ट बदलू शकले नाहीत,  ती म्हणजे भारताची कॅप मिळवणे. त्यामुळेच गुंजाळांचे नाव  "महाराष्ट्राचे दुर्दैवी क्रिकेटपटू ज्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले नाही" या लांबलचक यादीतील शीर्ष नावांपैकी एक आहे. जाऊया आठवणींच्या गावी खुद्द मिलिंद गुंजाळ यांच्यासोबत.

    53 min
  • Why we should celebrate India's chess Olympiad clean sweep

    बुद्धिबळाच्या ऑलिंपियाडमध्ये खुली स्पर्धा आणि महिला दोघांनाही सांघिक सुवर्ण आणि चार खेळाडूंना वैयक्तिक सुवर्णपदक इतकी जबरदस्त कामगिरी हंगेरीत रंगलेल्या स्पर्धेत झाली. भारत बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर होऊ शकतो, असं भाकित अनेकांचं होतं. २०२४ ऑलिंपियाड स्पर्धेने आपण सुपरपॉवर आहोत यावर शिक्कामोर्तब झालं. इतकी भारी कामगिरी एकाच वेळी पुरुष व महिलांनी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.या कामगिरीची चर्चा करूया 'वीकली कट्टा' मध्ये बुद्धिबळ विश्लेषक लोकेश नातू आणि 'द हिंदू 'चे क्रीडा पत्रकार अमोल क-हाडकर यांच्याबरोबर.
    India's chess has come of age. But the fact that it is a supepower has been stamped with a sensational all-round outing in the 2024 Chess Olympiad at Budapest, Hungary. With a tally of six gold medals - including open and women's team titles - India has literally clean-swept the top honours at the prestigious event. Chess analyst Lokesh Natoo and The Hindu's sports journalist Amol Karhadkar join Sports Katta's Aditya Joshi to shed light on the lead-up and the significance of the achievement. 

    32 min
  • Daughters Day Special: Meet Shital Mahajan, the freak skydriver

    She holds numerous world records. But even today, her passion is not really considered 'sport'. It has been over a decade since she was honoured with the Padma Shri. Yet she still has to go struggle for being acknowledged by - and seek permissions from - various authorities. Despite all this, nobody has been able to deter Sheetal Mahajan from her goal. Having overcome, various challenges and hurdles over the past two decades, Sheetal Mahajan has made great strides in the field of skydiving. She has indeed emerged as an inspiration for young athletes in the country. On the occasion of Daughter's Day, let's meet the girl who flies high into - and dives from - the sky.
    अनेक विश्वविक्रम तिच्या नावावर आहेत. पण आजही ती करते ते 'खेळ' म्हणून गृहित धरलं जात नाही. पद्मश्री पुरस्काराने तिला गौरवण्यात आलं, त्यालाही आता दशकभराचा कालावधी लोटला. तरीही अजूनही राजाश्रयासाठी आणि परवानग्यांसाठी तिला उंबरे झिजवावे लागतात. असं सगळं असलं तरी शीतल महाजनला तिच्या ध्येयापासून कोणीही परावृत्त करू शकलेलं नाही. गेली दोन दशकं विविध आव्हानं आणि अडथळ्यांवर मात करत स्कायडायव्हिंग क्षेत्रात तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. स्कायडायव्हिंग क्षेत्रातली ही 'शीतल' फुंकर देशातल्या असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. डॉटर्स डे च्या निमित्ताने भेटूया आकाशाशी नाते जोडणाऱ्या लेकीला.

    1 hr 10 min
  • Why you should follow India vs Bangladesh Test series

    No doubt Bangladesh are in form, having beaten Pakistan in Pakistan last month. Still, facing India on home soil has not been anyone's cup of tea. So the result of the two-Test series may be all but given but Weekly Katta gives you plenty of reasons why you should follow the series and Sports Katta. 
    गेल्या महिन्यात पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये धूळ चारून बांगलादेश फॉर्ममध्ये आहे यात शंका नाही. तरीही मायभूमीमध्ये भारताला मात देणे भल्याभल्यांनाही जमत नाही. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा निकाल हा जणू काही सर्वांनाच माहित आहे. तरीही हि मालिका व स्पोर्ट्स कट्टा का फॉल्लो करावी याची कारणे पाहूया "वीकली कट्टा" मध्ये

    23 min
  • Milind Rege: A stalwart who breathes Mumbai cricket

    "He eats Mumbai cricket, he sleeps Mumbai cricket and he breathes Mumbai cricket." The description fits Milind Rege, a stalwart! A prolific allrounder and a multiple Ranji Trophy champion. Rege recovered from a heart ailment to return to lead Mumbai. After retiring early in quest of a prospering corporate career, Rege thrived as a selector. He spotted a talent as progious as his childhood friend Sunil Gavaskar in Sachin Tendulkar and convinced his selection committee seniors to pick Tendulkar in the Ranji Trophy squad. Then on, till picking the likes of Prithvi Shaw and Yashasvi Jaiswal, Rege has played a a crucial role in Mumbai cricket's success story. In a freewheeling chat on Kattyawarchya Gappa with Amol Karhadkar, The Hindu's sports journalist, Rege narrates his terrific tale      
    मुंबई क्रिकेवर बोलणारे अनेक जण भेटतील. पण १९६५ पासून तब्बल सहा दशकं मुंबई क्रिकेटमध्ये सक्रिय सहभागी असलेले मिलिंद रेगे म्हणजे मुंबई क्रिकेटचा एनसायक्लोपिडिआच आहेत. सुनील गावस्कर ते पृथ्वी शॉ- यशस्वी जयस्वाल या सर्व पिढ्यांमध्ये समान धागा असेल, तर ते मिलिंग रेगे. गावस्कर आणि रेगेंची बालपणापासून असलेली दोस्ती सर्वश्रुत आहे, परंतु रेगेंचे मुंबईसाठी खेळताना आलेले अनुभव, तारुण्यात आलेल्या हार्ट-अटॅकनंतर त्यांनी केलेला कमबॅक, या गोष्टीही तेवढ्याच रंजक आहेत. प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून ऐन बहरात असताना निवृत्ती घेतल्यानंतर मुंबई क्रिकेटमधील विविध जबाबदाऱ्या - विशेषतः निवड समिती प्रमुख हि भूमिका - त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. रेगे सरांशी 'द हिंदू' चे क्रीडा पत्रकार अमोल क-हाडकर यांनी मारलेल्या 'कट्ट्यावरच्या गप्पा'
    ETA: asap

    1 hr 6 min

About Sports कट्टा

From the publisher's feed

'Sports Katta' caters to a Marathi-speaking sports lover. From analysing matches to business of sport to interviews with famous Marathi sportspersons, we are a one-stop destination for a Marathi…

More shows like Sports कट्टा

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां by Arpaa Radio

Stories of Akbar Birabal अकबर बीरबल की कहानियां

4 Listeners

The Odd Couple With Jaggu & Tarana by The Odd Couple

The Odd Couple With Jaggu & Tarana

2 Listeners

Long History Short with Ranjit by Ranjit Pawar

Long History Short with Ranjit

2 Listeners

Inspiring Stories by Nandini Revankar

Inspiring Stories

1 Listeners

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen) by Ideabrew Studios

Katha Udyojakanchi (Stories of Indian Businessmen)

0 Listeners

Mahakavyanchya Aprachlit Katha by BIG FM

Mahakavyanchya Aprachlit Katha

2 Listeners

Lok Kathao Ki Duniya by Er. Nishant Saxena Aahaan

Lok Kathao Ki Duniya

0 Listeners

SPOTBOYE PODCAST by Ideabrew Studios

SPOTBOYE PODCAST

0 Listeners

CTRL + ALT + WIN by Ideabrew Studios

CTRL + ALT + WIN

0 Listeners

Stories with Abhash Jha by Abhash Jha

Stories with Abhash Jha

0 Listeners

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్ by Policybazaar

PolicyBazaar - Telugu - బీమా ఇన్‌సైట్స్

0 Listeners

Ramadan Special by Shemaroo

Ramadan Special

0 Listeners

30 Films that changed Telugu cinema by BIG FM

30 Films that changed Telugu cinema

0 Listeners

Bullish by Mahesh Rathore

Bullish

0 Listeners

काहीतरी नविन | Kahitari Navin by Swayam Talks

काहीतरी नविन | Kahitari Navin

0 Listeners

AI Insights by Sunil Kumar

AI Insights

0 Listeners

Celebrating Life by Himali Mundra

Celebrating Life

0 Listeners

True Yoga Podcast by Bhavini Sharma

True Yoga Podcast

0 Listeners

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty by Aditya Prakash

The ISOLASHUN Podcast : A Search for Identity and Beauty

3 Listeners

Market ke  Fundey by Angel One

Market ke Fundey

0 Listeners