मी पुस्तक प्रेमी

मी पुस्तक प्रेमी

By Pramod DhokaleEducation
Download on the App Store

मी पुस्तक प्रेमी episodes

  • गणिती.....लेखक अच्युत गोडबोले व डॉ माधवी ठाकूर देसाई... पुस्तक परिचय.... ॲड प्रमोद ढोकळे
    गणित या विषयावर अत्यंत रंजक पद्धतीने हे पुस्तक लिहिलं आहे. या विषयाची आपली भीती हे पुस्तक वाचून दूर होते... प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं या दर्जाचं ते आहे.
    7 min
  • वॉल्डन ---लेखक हेन्री डेव्हिड थोरो --अनुवाद जयंत कुलकर्णी --पु. परिचय अ‍ॅड प्रमोद ढोकले
    वॉल्डन पुस्तकाने टॉलस्टॉय,मार्क्स,आणि गांधी अश्या जगप्रसिध्ह लोकांची आयुष्य बदलुन गेली. जगण्यासाठी माणसाला नेमक्या काय गरजा आहेत याचा शोध घेता यावा म्हणून वयाच्या 28 व्या वर्षी वॉल्डन तळ्याकाठी त्यांनी दोन वर्षे व्यतीत केली. दररोजच्या खाण्यापिण्याच्या नोंदी केल्या. बटाटा, घेवडा अशी पीक उजाड जमिनीत घेतली. स्वतः च्या हाताने घर बांधलं.
    समाजापासून वेगळं राहून निसर्गातील मुक्त जीवनाचा अनुभव घेतला .यासाठी त्यांना निसर्गवादी Naturalist विचारवंत समजलं जात. त्यांनी 20 खंडात आपले विचार लिहिले.
    जगातील अनेक थोर स्त्री पुरुषांनी थोरोचे विचार वाचून आपली जीवनशैली बदलली. आपल्याला विचारप्रवृत्त करणार हे पुस्तक नक्की वाचा.
    12 min
  • अमेरिकेचा न सांगितलेला इतिहास- लेखक ऑलिव्हर स्टोन व पीटर कुजनिक- पुस्तक परिचय ॲड प्रमोद ढोकळे
    मित्रांनो या एपिसोड मध्ये अमेरिकेचा जगाला ज्ञात नसलेला इतिहास ऑलिव्हर स्टोन आणि पीटर कुजनीक यांनी सांगितला आहे. आपली लोकशाही मिरवणारा आणि जगाला लोकशाहीचे धडे देण्यात धन्यता मानणारा देश म्हणजे अमेरिका अशी आपल्या सर्वांना अमेरिकेची ओळख आणि खात्री आहे. परंतु या पुस्तकात मात्र इतिहासकार पीटर कुजनीक यांनी पुराव्या सकट अमेरिका आपल्या भांडवलाच रक्षण करण्यासाठी जगामध्ये काय काय उच्छाद मांडत आहे याची जंत्री दिली आहे. जगातील लोकशाहीचा राखणदार देश म्हणून मिरवणारा अमेरिका इराणमधील इंडोनेशियामधील लोकशाहीचा गळा घोटला .व्हिएतनांमध्ये नापाम केमिकल अस्त्र वापरून 38 लाख लोकांचा बळी घेतला .हे सत्य या पुस्तकात लेखकाने सांगितल आहे. मध्यपूर्वे मधील तेल आपल्याला मिळाव म्हणून संपूर्ण मध्यपूर्वेत अमेरिकेने जी कृत्य केली आहेत ती वाचून आपल्यातला विवेकी आणि संवेदनशील वाचक अस्वस्थ होतो. आपल्या मुलांना अमेरिकेत पाठवून उठल्या बसल्या अमेरिकेचे नाव कौतुकाने घेणाऱ्या देशातील लोकांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे. इतिहास माणसाला शहाणपण शिकवतो. चुका करण्यापासून परावृत करतो आणि सुधारण्याची संधीही देतो. असं म्हटलं जातं. परंतु अमेरिकेने केलेल्या चुकां पासून कोणताही बोध न घेता पुन्हा पुन्हा जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवला आहे.अमेरिकेची ही काळी बाजू समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. पॉडकास्ट कसा वाटला तेही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.
    10 min
  • गर्जा महाराष्ट्र ..ले डॉ सदानंद मोरे...पुस्तक परिचय.. ॲड प्रमोद ढोकळे
    महाराष्ट्राचा इतिहास नेमका कुठून सुरू होतो? मराठे कुणाचे वंशज आहेत? जदुनाथ सरकार यांनी लिहिलेला इतिहास महाराष्ट्रावर अन्याय करणारा आहेच परंतु मराठी इतिहासकार ही जातनिरपेक्ष इतिहास लिहू शकले नाहीत. असे ठाम मत मोरे या पुस्तकात व्यक्त करतात. प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.
    10 min
  • इंदिरा गांधी एक वादळी पर्व - ले माधव गोडबोले...पुस्तक परिचय ॲड प्रमोद ढोकळे
    इंदिरा गांधी यांची कारकीर्द अतिशय वादळी होती. त्यांनी निर्माण केलेल्या बांगला देशासाठी त्यांचं कौतुक झालं. परंतु त्यांनी लादलेल्या आणीबाणी मुळे त्या हुकूमशहा ठरल्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व नेमकं कसं होत हे या पुस्तकात लेखकाने सांगितले आहे.
    त्याची समग्र माहिती लेखकाने दिली आहे. इतिहास या पुस्तकाची दखल घेईल.
    16 min
  • प्रेमातून प्रेमाकडे - ले अरुणा ढेरे .. पुस्तक परिचय .. ॲड प्रमोद ढोकळे
    अरुणा ढेरे यांनी लोकोत्तर स्त्री पुरुषांच्या आंतरसंबंधाची माहिती या पुस्तकात दिली आहे. त्यासाठी सखोल संशोधन करून अतिशय जबाबदारीने हे पुस्तक लिहिले आहे. मैत्री ने हे लोकोतर पुरुष कसे कसे प्रगल्भ होत गेले याची माहिती मिळते. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, विवेकानंद, गोपाळकृष्ण गोखले, श्रीधर व्यं केतकर, मिराबेन, सिस्टर निवेदिता, अन्नपूर्णा तर्खड, सरला घोषाल या व्यक्तींच्या संबंधाबद्ल वाचकांना महत्वाची माहिती मिळते.
    13 min
  • जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व एक सिंहावलोकन- लेखक- माधव गोडबोले- पुस्तक परिचय- ॲड प्रमोद ढोकळे
    प्रमोद ढोकळे यांनी केलेला लेखक माधव गोडबोले लिखित जवाहरलाल नेहरुंचे नेतृत्व या पुस्तकाचा परिचय . या पुस्तकासाठी लेखकाने सखोल संशोधन केले आहे. आपल्या मतांची सत्यासत्यता पडताळून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. नेहरूंचे गुण सांगताना त्यांच्या दोषांची परखड चर्चा या पुस्तकात आहे. इतिहासाची आवड भारतीय माणसांना कमी असल्याने 50 वर्षापूर्वी काय घडल या विषयीच अज्ञान जनमानसात आहे. This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2023/02/12/%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d/
    25 min
  • शोध नेहरूंचा आणि भारताचाही– लेखक शशी थरूर– पुस्तक परिचय- प्रमोद ढोकळे
    मित्रांनो या एपिसोड मध्ये मी शशी थरूर यांच्या शोध नेहरुंचा आणि भारताचाही या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे .शशी जरूर हे काँग्रेसचे पहिल्या फळीतले नेते . परंतु नेहरूंच्या जीवनावर विश्लेषणात्मक पुस्तक लिहून त्यांनी नेहरूंच्या चुका कोणत्या आणि नेहरूंची बलस्थान कोणती याची चर्चा या पुस्तकात केली आहे . शशी थरूर हे स्वतः इतिहासाचे अभ्यासक असल्याने त्यांच्या पुस्तकाला आणि मताला आंतरराष्ट्रीय वर्तुळांमध्ये महत्त्व असतं. नेहरूंचा समाजवाद, लोकशाही प्रेरणा, परराष्ट्र धोरण, आणि त्यांची धर्मनिरपेक्षता अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंवर हे पुस्तक प्रकाश टाकत. मनोज हे अत्यंत वाचनीय पुस्तक आहे.This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2023/01/26/%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be/
    11 min
  • Exciting Experience in Gir Lion Park
    Friends I visited Gir national park between 13th to 17th November 22. I could experience some unforgettable incidents. In this episode have narrated it . Hope it will motivate you to visit Gir lion park and witness more such thrilling spectacle.
    14 min

About मी पुस्तक प्रेमी

From the publisher's feed

मला पुस्तक खुप खुप आवडतात. पुस्तकांनी आयुष्य समृद्ध होत. मला ठावुक आहे की तुम्हालाही पुस्तक खुप आवडतात. मला आवडलेली पुस्तक मी खास तुमच्यासाठी आणली आहेत. कशी वाटतात ते सांगा. त्यावर आपण गप्पा मारुयात.…